शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : पिपीई कीट घालुन तळेरेत युवकांनी केले वृध्दावर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 14:01 IST

स्वॅब टेस्टचा अहवाल येण्याआधीच वैद्यकीय उपचारादरम्यान बुधवारी निधन झालेल्या तळेरे गावातील वृद्धावर तळेरे येथील युवकांकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. कणकवली सभापती दिलीप तळेकर, प्रसाद कल्याणकर, प्रदिप तळेकर, प्रफुल तळेकर अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी दाखविलेल्या या वृत्तीतून माणुसकीचे दर्शन घडविले असून याबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.

ठळक मुद्देपिपीई कीट घालुन तळेरेत युवकांनी केले वृध्दावर अंत्यसंस्कारपरिसरात कौतुक : माणुसकीचे घडविले दर्शन

तळेरे : स्वॅब टेस्टचा अहवाल येण्याआधीच वैद्यकीय उपचारादरम्यान बुधवारी निधन झालेल्या तळेरे गावातील वृद्धावर तळेरे येथील युवकांकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. कणकवली सभापती दिलीप तळेकर, प्रसाद कल्याणकर, प्रदिप तळेकर, प्रफुल तळेकर अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी दाखविलेल्या या वृत्तीतून माणुसकीचे दर्शन घडविले असून याबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.तळेरे गावठण येथील राजाराम देसाई (६८) यांना मंगळवारी श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने ओरोस येथे जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिथे कोरोना टेस्टसाठी स्वॅब घेऊन पुढील उपचार सुरु करण्यात आले. परंतु, स्वॅब टेस्टचा अहवाल येण्यापूर्वीच बुधवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. निधनानंतरही त्यांचा स्वॅब टेस्टचा अहवाल आला नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तो मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार नसल्याचे सांगितले.दरम्यान, देसाई यांचा मृत्यू झाल्याचे समजताच पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तत्काळ ओरोस येथे धाव घेतली. देसाई यांचा कोरोना अहवाल आजच मिळणे शक्य नसल्याने मृतदेहाचे करायचे काय हा प्रश्न निर्माण झाला होता. कोरोना अहवाल येण्याआधीच मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करणार कसे? ही अडचण होती. त्याशिवाय वैद्यकीय अधिकाºयांनी मृतदेह ताब्यात देणार नसल्याचे सांगितले.तरीदेखील पूर्णपणे तो मृतदेह तळेरे येथे आणून दिलीप तळेकर व त्यांचे तळेरे येथील सहकारी यांनी अत्यंत धाडसाने स्वत: पिपीई किट परिधान करुन देसाई यांच्यावर तळेरे येथे स्मशानभूमीत सर्व नियमांचे पालन करुन अत्यंसंस्कार केले.राजाराम देसाई हे देसाई मामा या नावाने परिचित होते. सर्वसामान्य कुटून्बतिल असलेल्या देसाई यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे.स्वत:चा जीव धोक्यात घालून विधीयावेळी देसाई यांचा मुलगा, काही नातेवाईक, प्रसाद कल्याणकर, प्रदिप तळेकर, प्रफुल तळेकर उपस्थित होते. देसाई यांचा अहवाल यथावकाश पॉझिटिव्ह अथवा निगेटिव्ह येईल. परंतु कोरोना रिपोर्ट यायचा असतानाही दिलीप तळेकर आणि सहकाऱ्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून दाखवलेले माणुसकीचे दर्शन नक्कीच कौतुकास्पद आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग