शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

corona virus : शिरगांव येथे तीन दिवसांत चार कोरोना पॉझिटिव्ह सापडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 15:00 IST

देवगड तालुक्यातील शिरगांव गांवठण येथे गेल्या तीन दिवसांत चार कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने गावात एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीची उपाययोजना म्हणून येथील व्यापारी संघाने तातडीची बैठक घेऊन पाच दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देशिरगांव येथे तीन दिवसांत चार कोरोना पॉझिटिव्ह सापडलेगावातील सर्व व्यापारी आस्थापना पाच दिवस बंद राहणार : व्यापारी संघाचा निर्णय

शिरगांव : देवगड तालुक्यातील शिरगांव गांवठण येथे गेल्या तीन दिवसांत चार कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने गावात एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीची उपाययोजना म्हणून येथील व्यापारी संघाने तातडीची बैठक घेऊन पाच दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.शिरगांव गांवठण येथे कणकवली तालुक्यातील कासार्डेतून विवाहिता आपल्या माहेरी आली होती. तिची मंगळवारी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर बुधवारी दोघेजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांच्या घरातील गणपती विसर्जन कार्यक्रमात सहभागी झालेल्यांची आरोग्य विभागाने यादी तयार करून त्यांना होम क्वारंटाईन राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.दरम्यान, बुधवारी कोरोना बाधित आलेल्या या दोघांच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर गुरुवारी त्यांच्या मेव्हण्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांत शिरगांव येथील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता चार झाली आहे. कोरोना बाधित या तिघांच्या घरापुरता कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे.दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कोंडके यांनी शिरगांवला बुधवारी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.पाच दिवस बाजारपेठ बंद राहणारशिरगांव व्यापारी संघाने बुधवारी सायंकाळी हनुमान मंदिरात तातडीची बैठक घेऊन खबरदारीची उपाययोजना म्हणून ३ ते ७ सप्टेंबर या पाच दिवसांच्या कालावधीकरिता सर्व व्यापाऱ्यांनी आपापली आस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र औषधाची दुकाने सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यानंतर अत्यावश्यक असल्यास रुग्णांना औषध दुकान उघडून औषधे दिली जाणार आहेत. व्यापारी संघाच्या या निर्णयामुळे नेहमी गजबजलेल्या पंचक्रोशीच्या बाजारपेठेत गुरुवारी शुकशुकाट जाणवत होता. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग