शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : एकाच दिवशी सापडले १५ रुग्ण, खारेपाटण पंचक्रोशीत कोरोनाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 16:48 IST

कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावाबरोबरच आजूबाजूच्या पंचक्रोशीतील इतर गावात मिळून  एकाच दिवशी तब्बल १५ व्यक्तीचे स्वब तपासणी अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत.

ठळक मुद्देएकाच दिवशी सापडले १५ रुग्ण, खारेपाटण पंचक्रोशीत कोरोनाचा कहर वारगाव १0, नडगिवे ४, खारेपाटणमध्ये १ बाधित

खारेपाटण : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावाबरोबरच आजूबाजूच्या पंचक्रोशीतील इतर गावात मिळून  एकाच दिवशी तब्बल १५ व्यक्तीचे स्वब तपासणी अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत.खारेपाटण येथे- १,नडगिवे येथे-४,तर वारगाव येथे सर्वाधिक १0 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. यामुळे खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील कोरोना बाधित व्यक्तीची संख्या ही ७५ वर जाऊन पोहोचली आहे. यामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ४२ एवढी असून बरे झालेले एकूण रुग्ण ३२ आहेत तर १ मृत आहे.ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर कोरोना बाधित व्यक्तीच्या संख्येत रोज होणारी वाढ नागरिकांच्या चिंतेत भर टाकणारी आहे. शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये वारगाव बौद्धवाडी येथे १६ आॅगस्ट रोजी एक व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली होती. तिच्या संपर्कातील कुटुंबातील ४ व्यक्तीचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

तर वारगाव रोडयेवाडी येथील एका व्यक्तीचा १६ आॅगस्टला एकाला कोरोनाची लागण झाली होती. त्याच्या कुटुंबातील ४ व्यक्तींचे तपासणी अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. तर वारगाव नरवाडी येथे १ तर रोडयेवाडी येथे १ असे मिळून वारगावात विविध ठिकाणी मिळून एकूण १0 कोरोना बाधित रुग्ण आढळले.तसेच नडगिवे मधलीवाडी येथे नव्याने ४ कोरोना बाधित रुग्ण आढळले. तर खारेपाटण कोंडवाडी १५ आॅगस्ट रोजी कोरोना मुळे मृत्यू झालेल्या १८ वर्षीय युवकाच्या कुटुंबातील एका व्यक्तीचा स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून आशाप्रकारे खारेपाटण पंचक्रोशीत विविध ठिकाणी आज एकूण १५ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.

तर खारेपाटण पंचक्रोशी तसेच खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या चिंचवली, वायंगणी, बेर्ले, शिडवणे व साळीस्ते ता गावातून अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे या गावातील सरपंच व ग्रामसनियंत्रण समितीने कोरोनाला वेशिवरच रोखण्यासाठी केलेले प्रयत्न व कार्य कौतुकास पात्र आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली हा तालुका जिल्ह्यातील कोरोना चा ह्यहॉटस्पॉटह्ण तथा केंद्रबिंदू ठरत असतानाच आता कणकवली तालुक्यातील खारेपाटण हे गाव व पंचक्रोशी कोरोनाचे कणकवली तालुक्याचे हॉटस्पॉट ठिकाण ठरत आहे. त्यामुळे आता स्थानिक ग्रामपातळीवरील ग्रामस्तरीय सनियंत्रण समिती बरोबरच आरोग्य विभागा समोर कोरोनाचे मोठे संकट आवसून उभे राहिले आहे.खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ३७ जणांना कोरोनाची लागणखारेपाटण पंचक्रोशी ही कणकवली तालुक्यातील कोरोना संसगार्चे हॉट स्पॉट ठिकाण बनत चालले असून खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या वारगाव या गावी आजपर्यंत सर्वाधिक ३७ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून यामध्ये ३२ रुग्ण सक्रिय आहेत. तर आतापर्यंत ५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.यापाठोपाठ खारेपाटण मध्ये एकूण २७ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून यापैकी फक्त ६ रुग्ण सक्रिय आहेत व २0 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर १ मृत्यूची नोंद आहे. तसेच नडगिवे येथे आता पर्यंत एकूण ५ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून ४ रुग्ण सक्रिय आहेत.

१ रुग्ण यापूर्वीच बरा होऊन घरी गेलेला आहे. याच बरोबर कुरुंगावणे या गावी ५ कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. हे सर्व रुग्ण यापूर्वीच बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच शेर्पे या गावी सुद्धा १ कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. तो देखील बरा होऊन घरी गेला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग