शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

corona in sindhudurg-वायंगणी येथील कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 17:39 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडलेल्या तिसऱ्या कोरोना बाधीत रुग्णाच्या अतिजोखमीच्या संपर्कातील सर्वच्या सर्व 19 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

ठळक मुद्देवायंगणी येथील कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह 7 व्यक्तींचे घशातील स्त्रावाचे नमुने अहवाल प्रलंबित

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात सापडलेल्या तिसऱ्या कोरोना बाधीत रुग्णाच्या अतिजोखमीच्या संपर्कातील सर्वच्या सर्व 19 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर चौथ्या कोरोना बाधीत रुग्णाच्या अतिजोखमीच्या संपर्कातील सर्वच्या सर्व 7 व्यक्तींचे घशातील स्त्रावाचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. सदर व्यक्तींचे अहवाल येणे प्रलंबित आहे.वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी परिसरामध्ये कोरना बाधीत रुग्ण सापडला होता. या परिसराच्या 3 किलोमीटरच्या क्षेत्रातत कन्टेन्मेंट झोन तयार करण्यात आला असून याठिकाणी नागरिकांचे सक्रिय सर्वेक्षण करण्यात आले आहे.

एकूण पाच गावांमध्ये राबवण्यात आलेल्या या सर्वेमध्ये 23 सेक्टर तयार करून 23 पथकांमार्फत सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये 1178 घरांमधील 4886 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. या सर्वेक्षणामध्ये एकाही व्यक्तीस कोरोना सदृष्य लक्षणे आढळून आली नाहीत. एकूण 2443 पुरुष व 2533 स्त्रियांची तपासणी करण्यात आली आहे.जिल्ह्यात एकूण 759 व्यक्ती अलगीकरणात असून 485 व्यक्तींना गृह अलगीकरणात तर 274 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 708 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 671 रुग्णांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 4 अहवाल पॉजिटीव्ह आले असून उर्वरीत 667 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 37 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण 61 रुग्ण दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज रोजी 4696 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.जास्तीत जास्त जिल्हावासियांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करून त्याचा वापर करावा. तसेच वेबसाईटचा वापर करून ऑनलाईन ओपीडी व प्राथमिक उपचाराबाबतचे मार्गदर्शन घ्यावे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर जिल्ह्यातून व परराज्यातून येऊ इच्छिणारे नागरिका तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून परजिल्ह्यात व परराज्यात जाऊ इच्छिणारे नागारिक जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर आपली माहिती भरुन पाठवित आहेत.

प्राप्त माहितीवरून परजिल्ह्यात व परराज्यात जाणाऱ्या व येणाऱ्या नागरिकांकरिता पास देण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनामार्फत सुरू आहे. परजिल्ह्यात जाणाऱ्या व जिल्ह्यात येणाऱ्या लोकांसाठी एस.टी. बसची व्यवस्था करण्यात आली आहे.

याबाबतची योग्य ती सर्व व्यवस्था करण्याबाबतचे आदेश वाहतूक महाव्यवस्थापक यांनी सर्व विभाग नियंत्रकांना दिलेत.आतापर्यंत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जाण्यासाठी 10 हजार 612 व्यक्तींनी जिल्हा प्रशासनाच्या लिंकवर नोंद केली आहे. या सर्वांना त्यांच्या संबंधित जिल्ह्यामध्ये प्रवेश देण्याविषयी त्यांच्या जिल्हा प्रशासनास कळविण्यात आले आहे.

राज्याबाहेर जाण्यासाठी 12 हजार 679 व्यक्तींनी लिंकवर नोंदणी केली आहे. या सर्वांना त्यांच्या संबंधित राज्यात प्रवेश देण्याबाबत त्यांच्या राज्य शासनास कळविण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 986 नागरिक तर जिल्ह्यातून इतर राज्यांमध्ये 1614 नागरिक गेले आहेत.सिंधुदुर्गात येण्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून 17 हजार 288 हजार व्यक्तींनी नोंदणी केली आहे. त्यापैकी रेड झोनमधील हॉटस्पॉट व कंटेन्मेंट झोन मधील व्यक्ती वगळून इतर क्षेत्रातील व्यक्तींची माहिती परवानगी देण्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनास कळविली आहे.

परराज्यातून जिल्ह्यात परतण्यासाठी 1396 व्यक्तींनी नोंद केली आहे.गोवा राज्यातून 962 व्यक्तींना जिल्ह्यात प्रवेश देण्यात आला आहे. तर महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यांमधून मिळून 532 व्यक्तींना जिल्ह्यात येण्यास परवानगी देण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग