शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

corona virus Sindhudurg : मिथिलीन ब्ल्यू औषधास मान्यता द्यावी : विवेक रेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 16:18 IST

corona virus Sindhudurg : कोविडवर प्रभावी औषध म्हणून ह्यमिथिलीन ब्ल्यूह्णचा उपयोग झाल्यास प्राणवायू आणि व्हेंटिलेटरची गरज लागणार नाही. असा विश्वास रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर मालवणचे डॉ. विवेक रेडकर यांनी व्यक्त केला. सरकारने या औषधाची मात्रा रुग्णांवर देण्यासाठी मान्यता द्यावी, असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे.

ठळक मुद्दे मिथिलीन ब्ल्यू औषधास मान्यता द्यावी - विवेक रेडकर यांची मागणीकोविडवर प्रभावी औषध; प्राणवायू, व्हेंटिलेटरची गरजच नाही

कुडाळ : कोविडवर प्रभावी औषध म्हणून ह्यमिथिलीन ब्ल्यूह्णचा उपयोग झाल्यास प्राणवायू आणि व्हेंटिलेटरची गरज लागणार नाही. असा विश्वास रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर मालवणचे डॉ. विवेक रेडकर यांनी व्यक्त केला. सरकारने या औषधाची मात्रा रुग्णांवर देण्यासाठी मान्यता द्यावी, असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरतर्फे सकारात्मक संशोधन करून वैद्यकीय क्षेत्रात निलक्रांती करण्याचे प्रयत्न डॉ. विवेक रेडकर करीत आहेत. कुडाळ एमआयडीसी विश्रामगृहात डॉ. रेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी संस्थेचे विश्वस्त रविकिरण तोरसकर, डॉ. विद्याधर तायशेटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. रेडकर म्हणाले की, सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर देशात कोविड रुग्णांची होणारी वाढ काळजी करणारी आहे. रुग्ण रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी ऑक्सिजन व व्हेंटिलेटरचा शोध घेतो. या मिथीलीन ब्ल्यू औषधामुळे रुग्णाला ऑक्सिजनची गरज भासणार नाही असे संशोधनाअंती समोर आले आहे. हे औषध सुमारे १४२ वर्षांपासून सुरू दिले जात आहे. मालवण कोविड केंद्रात औषधाच्या मात्रा देऊन  संशोधनामध्ये प्राधान्य दिले आहे.डॉ. विवेक रेडकर म्हणाले, मालवण कोविड केंद्रावर दर आठवड्याला सरासरी सतरा रुग्ण दाखल होतात. गेल्या तीन आठवड्यात आम्ही दाखल झालेल्या सर्व रूग्णांवर मिथीलीन ब्ल्यू अर्थात एम बी औषध देऊन बघितले तेथे रोज तीन ते पाच रुग्ण व्हेंटिलेटरवर, ऑक्सिजनवर ॲडमिट असतात. १० रुग्ण ऑक्सिजन वर असतात, हे सगळे ८८ टक्के पेक्षा कमी ऑक्सिजन मात्र असलेले रूग्ण असतात नॉर्मल किंवा व्हीआयपी कारण नसताना रेमडेसिविर मागणारे असतात.गेल्या तीन आठवड्यात एमबी औषध दिलेला एकही रुग्ण दगावला नाही. शिवाय ऑक्सिजन सिलिंडर दिवसाला पंधरा ते अठरा लागत होते ते आता या औषधामुळे आठ लागत आहे. ऑक्सिजन कमी झाल्यावर लगेच ॲडमिट झाला तर हे औषध जास्त परिणामकारक ठरते.मिथीलीन ब्ल्यू हे १४२ वर्ष जुने औषध आहे. जगात एकही रुग्णाला या औषधाची रिॲक्शन येऊन दगावलेला नाही. किडणीचे विकार, डायलेसिस, गरोदर माता व मातेच्या दुधावर असलेल्या मुलांना ते देऊ नये असे त्यांनी सांगितले. मात्र हे औषध एक वर्ष मुलापासून शंभर वर्ष वयस्कर लोकापर्यंत देऊ शकतो असे डॉ. विवेक रेडकर यांनी स्पष्ट केले.म्युकरमायकोसिसवरदेखील प्रभावी ठरेलशासकीय कोविड केंद्रात औषध वापरण्याची परवानगी लागेल त्यासाठी सरकारने मान्यता द्यायला हवी असे ते म्हणाले. तसेच जागतिक आरोग्य संघटना किंवा सरकारने मान्यता दिली तर रुग्णांना हे औषध प्राणवायू शिवाय उपचार ठरेल. कोविड होऊ नये म्हणून फायदेशीर ठरणारे औषध कोविड रुग्ण, लहान मुलांना देखील उपचारासाठी उपयोगी आहे.

एक वर्षाच्या मुला पासून वयस्कर लोकांना उपयुक्त आहे. मात्र किडणी आजार, डायलेसिस, गरोदर माता व मातेच्या दुधावर असलेल्या मुलांना ते देऊ नये. हिमोग्लोबीन, फुफ्फुसे, शरीरासह अन्य घटकांना औषध उपयुक्त आहे. म्युकरमायकोसिस या जीवघेण्या आजारावर देखील त्याचा शास्त्रीय पद्धतीने वापर केला तर उपयोग ठरू शकतो, असे रेडकर यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmedicineऔषधंdocterडॉक्टरsindhudurgसिंधुदुर्गhospitalहॉस्पिटलkudal-acकुडाळ