शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
3
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
4
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
5
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
6
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
7
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
8
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
9
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
10
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
11
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
12
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
13
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
14
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
15
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
16
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
17
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
18
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
19
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
20
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी

भुयारी गटारावरून वादंग

By admin | Updated: December 20, 2014 23:23 IST

भुयारी गटार योजन नियोजनशून्य

मालवण : नगरपालिकेची शनिवारची मासिक सभा भुयारी गटार योजनेच्या नियोजनशून्य कामाच्या विषयावरून चांगली गाजली. नागरिक व व्यापाऱ्यांना होणाऱ्या त्रासाबाबत माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी मुख्याधिकारी व प्रशासनास फैलावर घेतले. भुयारी गटाराचे काम संबंधित ठेकेदाराने योग्य पद्धतीने व लवकर पूर्ण न केल्यास ठेकेदाराला बिल अदा करू नये, अशी मागणी यावेळी सुदेश आचरेकर यांनी केली. नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांनी संबंधित ठेकेदाराला सूचना देवून काम लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन दिले.सभा नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मालवणवासीयांच्या डोकेदुखी ठरलेल्या भुयारी गटारच्या कामाबाबत जोरदार चर्चा झाली. जावकर यांनी या प्रश्नावर झोड उठविली. प्रशासनाला जाब विचारला . एकाचवेळी शहरातील महत्वाच्या रस्त्यांवर खोदाई सुरू केल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बाजारपेठ रस्ता भुयारी गटाराच्या कामामुळे गेला एक महिना वाहतुकीस बंद आहे. ऐन पर्यटन हंगामात हा रस्ता बंद असल्याने व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच खोदलेले रस्ते बोल्डर न टाकता केवळ मातीने बुजविण्यात आले असून त्यावरच डांबरीकरण केल्यास भविष्यात हे रस्ते खचतील. त्याचप्रमाणे भुयारी गटाराबरोबरच बीएसएनएलची लाईन टाकण्यासाठी रस्त्याची खोदाई करण्यात येत असून त्यांचीही तीच गत आहे. रस्ते खराब झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या कामावर नगरपालिका प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नाही. अशी टीका जावकर यांनी केली. जावकर यांच्या विधानात माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनीही दुजोरा देत प्रशासनाला धारेवर धरले. नागरिकांना भुयारी गटार कामामुळे होणाऱ्या त्रासाबाबत नगरपालिकेच्यावतीने आचरेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. तसेच यावेळी उपस्थित असलेल्या भुयारी गटार ठेकेदाराला बाजारपेठ मुख्यरस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम त्वरित हाती घेण्याच्या सूचना नगराध्यक्ष तोडणकर यांनी केल्या. शहरातील नागरिकांना आवश्यक सुखसुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासन असमर्थ असेल तर नागरिकांची २५ टक्के घरपट्टी माफ करावी. अशी मागणी जावकर यांनी केली. यावेळी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, नगरसेवक दीपक पाटकर, मंदार केणी, जॉन नऱ्होना, महेंद्र म्हाडगुत, रवीकिरण आपटे, सेजल परब, रेझीना डिसोजा, पुजा करलकर, शिल्पा गिरकर, स्नेहा आचरेकर, महानंदा खानोलकर, ममता वराडकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)