शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

१ जूनपासून नियंत्रण कक्ष

By admin | Updated: May 21, 2015 00:03 IST

गुरूनाथ पेडणेकर : जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा

सिंधुदुर्गनगरी : अत्यावश्यक रुग्णसेवा १०८ अंतर्गत अजून २ रुग्णवाहिकांची (अ‍ॅम्ब्युलन्स) मागणी आरोग्य उपसंचालकांकडे करण्यात आल्याची तर १ जूनपासून जिल्हास्तरावर व तालुक्यात साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करणार असल्याची माहिती आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी बुधवारी सभेत दिली.जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात सभापती गुरुनाथ पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी समिती सदस्य प्रमोद कामत, संग्राम प्रभुगावकर, निकिता जाधव, कल्पिता मुंज, भारती चव्हाण, समिती सचिव व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अधिकारी, खातेप्रमुख आदी उपस्थित होते. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एनआरएचएम) अंतर्गत अत्यावश्यक रुग्ण सेवा १०८ सेवा देशात सुरु आहे. या योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याला ८ रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. रुग्णवाहिकांमुळे जिल्ह्यातील अनेक रुग्णांना अत्यावश्यक सेवा मिळाल्याने त्यांचा जीव वाचला आहे. अत्यावश्यक रुग्णसेवा १०८ या सेवेचा जिल्ह्यातील रुग्णांना होणारा फायदा व आवश्यकता पाहता आणखी दोन रुग्णवाहिका जिल्ह्याला मिळाव्यात अशी मागणी करण्यात आली असून तसा प्रस्तावही आरोग्य उपसंचालकांकडे सादर करण्यात आला आहे. तसेच पावसाळा जवळ आला असून पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथरोगांवर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. त्याच धर्तीवर कुठल्याही रुग्णाची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हास्तरावर व तालुक्यात १ जूनपासून साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करणार असल्याची माहिती सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी सभेत दिली. वेंगुर्ले तालुक्यातील आडेली प्राथमिक आरोग्यकेंद्र आणि प्राथमिक आरोग्यकेंद्र पणदूर या आरोग्यकेंद्रात करण्यात आलेले लाईट फिटींगचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यासाठी जुने साहित्य वापरले असल्याचा आरोप सभापती पेडणेकर यांनीच सभेत करत संबंधित ठेकेदारांना बिल अदा करू नये व त्याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. (प्रतिनिधी)सदस्यांना किंमत नाही? हिर्लोक प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या सभागृह बांधकामासंदर्भात विषय चर्चेत आला असता सदस्या निकिता जाधव आक्रमक होत संबंधित विषय दोन वर्षे सभागृहात सुरु आहे त्याचे गांभिर्य ओळखून सभागृहाचे बांधकाम एवढ्यात पूर्ण झाले होते असे सांगत सभागृहाच्या बांधकामास एवढा वेळ लावत असल्याने व सदस्यांच्या मुद्यांवर कोणी लक्ष देत नसल्याने सदस्यांना किंमत आहे की नाही? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.