शिरवळ : महामार्ग गेला खड्ड्यात.. ‘टोल ५५ अन् खड्डे ५५ हजार’ या मथळ्याखाली राष्ट्रीय महामार्गाच्या अवस्थेचे ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित ठेकेदार कुंभकर्णी झोपेतून जागे झाले आहे. नागरिकांच्या रोषाला आणखी सामोरे जावे लागू नये, यासाठी ठेकेदाराकडून शिरवळ येथील सेवा रस्त्यांची व महामार्गाची दुरुस्तीने काम तात्पुरत्या स्वरुपात घेण्यात आले आहे.राष्ट्रीय महामार्गाचे राष्ट्रीय प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली ठेकेदारामार्फत सहापदरीकरणाचे काम सध्या संथगतीने सुरू आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने महामार्गावरील रस्त्याचे व सेवा रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. याबाबतचे सद्य:स्थितीचे परिस्थिती ‘लोकमत’ने मांडल्यानंतर नागरिकांमध्ये ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष आदेश जमदाडे व कार्यकर्त्यांनी संबंधित ठेकेदाराना ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन अक्षरश: धारेवर धरले व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शिरवळ येथील सेवा रस्त्यांची तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती करण्याची व पावसाळ्यानंतर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली. दरम्यान, याठिकाणी मोठ्या सेवा रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य झाले असल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. याठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती न करता कामयस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे. दरम्यान, सध्या या ठिकाणी ठेकेदाराकडून जेसीबीच्या साह्याने खड्डे मुजविण्याचे व पाणी साठू नये, यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. . नागरिकांच्या रोषाला आणखी सामोरे जावे लागू नये, यासाठी ठेकेदाराकडून शिरवळ येथील सेवा रस्त्यांची व महामार्गाची दुरुस्तीने काम तात्पुरत्या स्वरुपात घेण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
ठेकेदार खडबडून जागे!-- लोकमतचा दणका
By admin | Updated: August 8, 2014 00:42 IST