शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
6
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
7
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
8
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
9
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
10
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
11
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
12
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
13
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
14
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
15
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
16
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
17
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
18
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
19
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
20
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे बांधकाम संथ

By admin | Updated: May 23, 2015 00:37 IST

दाभोलीतील पुलाची अवस्था : सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारीच गायब; काम निकृष्ट होण्याची भीती

वेंगुर्ले : रेडी-रेवस महामार्गावरील दाभोली गावात गेले साडेतीन महिने काम सुरू असलेल्या छोट्या पूल कम मोरीचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारी व ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे संथगतीने सुरू आहे. बांधकामाच्या ठिकाणी ठेकेदार व अभियंता यांची उपस्थिती नसल्याने ते काम निकृष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.८ मे पर्यंत या पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याचे आश्वासन देणाऱ्या बांधकाम विभागाने ४ जूनपर्यंत पूल पूर्ण करून रस्ता वाहतुकीस सुरळीत न केल्यास बांधकाम कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पंचायत समिती सदस्य समाधान बांदवलकर यांनी लेखी निवेदनाद्वारे वेंगुर्ले बांधकाम उपविभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. या आंदोलनास हिंसक वळण लागून नुकसान झाल्यास त्यास बांधकाम खातेच जबाबदार राहील. तसेच पुलाच्या ठिकाणी अपघात व जीवितहानीचा प्रसंग घडल्यास त्यास सार्वजनिक बांधकाम खात्यास जबाबदार धरले जाईल, असेही बांदवलकर यांनी निवेदनात म्हटले आहे. दाभोली, खानोली, हरिचरणगिरी, वायंगणी, वेतोरे भागातील छोटे-मोठे व्यापारी तसेच शालेय मुले आणि रोजगारासाठी वेंगुर्ले शहरात जाणारे सर्वसामान्य यांच्यासाठी वेंगुर्ले शहर हे मुख्य ठिकाण असून, गेल्या साडेतीन महिन्यांपासून या गावातील रेडी-रेवस महामार्गावर पुलाचे (मोरीचे) काम सुरू आहे. ठेकेदार व अधिकारी यांची कामाच्या ठिकाणी उपस्थिती नसल्याने ८ मेपर्यंत पूर्ण होणारे काम अर्धवट राहिले आहे. (प्रतिनिधी)आंदोलनाचा इशारापावसाळा तोंडावर आला असून, सखल भागातून काढलेला पर्यायी मार्ग पावसाळ्यात पूर्णत: बंद राहणार असून, वेंगुर्ले शहर आणि दाभोली पंचक्रोशीतील गावांचा संपर्क तुटणार आहे. या पुलाच्या ठिकाणी अपघात व जीवितहानी होण्याची शक्यता वाढली आहे. पावसाळ्यापूर्वी मोरीचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे. ४ जूनपर्यंत पुलाचे काम पूर्ण होऊन रस्ता वाहतुकीस सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा पंचायत समिती सदस्य समाधान बांदवलकर यांनी दिला आहे.