शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

रत्नागिरीतील गुन्हेगारीचे लखनौपर्यंत कनेक्शन

By admin | Updated: September 21, 2015 00:08 IST

ठेकेदार खून : मोईनकडून पोलिसांची दिशाभूल

रत्नागिरी : अभिजित पाटणकर खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार मोईन काझी चुकीची माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याने अभिजितचा केलेला खून हा मोबाईल विक्रीच्या व्यवहारातून झाला, की आणखी काही कारणे या खुनामागे होती, याबाबत चर्चेला उधाण आले आहे. अभिजितच्या खुनामुळे रत्नागिरीच्या गुन्हेगारीचे लखनौशी असलेले कनेक्शन उघड झाले असले, तरी गुन्हेगारीचे हे ‘नेटवर्क’ उघडे पाडणे पोलिसांसमोरील मोठे आव्हान ठरणार आहे. ठेकेदार स्वप्निल मोरे यांच्या निर्घृण खुनानंतर अभिजित पाटणकर या ठेकेदार तरुणाचा गोळ्या झाडून खून झाल्याने शांत रत्नागिरीच्या प्रतिमेला काळिमा फासला गेला आहे. हा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमधील संघर्षातून झालेला खून असल्याचे पुढे आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अनेकांकडे परवाना असलेल्या बंदुका, पिस्तूल्स आहेत, परंतु गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांकडे परवाना नसलेली अनेक शस्त्रे असावीत, अशी चर्चा नेहमीच होते. ही शस्त्रे जर असतील तर ती येतात कुठून, कोणाकडून या शस्त्रांचा पुरवठा केला जातो याची खातरजमा करण्यासाठी सुरक्षा यंत्रणेकडे काय व्यवस्था आहे, असा सवालही निर्माण झाला आहे.रत्नागिरीच्या काही ठरावीक भागात ‘राडेबाजी’चे प्रकार नेहमीच सुरू असतात. जुगाराचे अड्डेही चर्चेत आहेत. या सर्व प्रकारांना कोणाचे अभय आहे? कोणामुळे ही विषवल्ली पसरत चालली आहे? गेल्या काही वर्षांत रत्नागिरी शहर व परिसरात अफू, गांजा तसेच गर्दसारखे मादक पदार्थही उपलब्ध होत आहेत. वन्य प्राण्यांची चामडी, कासवांची तस्करी, काही दुर्मीळ व महत्त्वाच्या वनस्पतींची चोरी, तस्करी हे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे यामागे गुन्हेगारीचे आंतरराज्य रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. (प्रतिनिधी) रॅकेटची बांधणी?जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे रत्नागिरी जिल्ह्याचे नाव केवळ देशातच नव्हे, तर देशाबाहेरही बहुचर्चित बनले आहे. रायगडच्या औद्योगिकीकरणानंतर आता रत्नागिरीच्या औद्योगिकीकरणाचा वेग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक उद्योग येथे येण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे भविष्यातील औद्योगिक रत्नागिरीत आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी काही गुन्हेगारांचे रॅकेट आतापासूनच कार्यरत झाले आहे काय, अशी चर्चाही लखनौ कनेक्शनमुळे सुरू झाली आहे.मोईन व लखनवी माफियामोईनचे लखनवी माफियाशी संबंध आहेत हे पोलिसांनी तपासात उघड केलेले सत्य आहे. त्यामुळे हे गुन्हेगारीचे रत्नागिरी ते लखनौ रॅकेट उखडून काढण्यासाठी रत्नागिरी व लखनौ पोलिसांना संयुक्तपणे प्रयत्न करावे लागणार आहेत. उत्तर प्रदेश, बिहारमधील गुुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेता ते लोण शांत असलेल्या कोकणात येऊ नये, यासाठी हे रॅकेट उखडून टाकणे महत्त्वाचे ठरणार आहे. ज्या मोईनने अभिजितचा काटा काढला त्याच्याकडे अटक केल्यानंतर चार मोबाईल, २१ सीमकार्ड व अनेक बनावट ओळखपत्र सापडणे ही बाबही गंभीर आहे.