शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे संताजी, भाजपच्या सज्जन रावराणेंची निवड

By admin | Updated: December 2, 2015 00:40 IST

स्वीकृत नगरसेवक : चर्चेतील दावेदारांना ऐनवेळी डावलले

वैभववाडी : वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी काँग्रेसचे संताजी अरविंद रावराणे तर भाजपचे सज्जन विनायक रावराणे यांची वर्णी लागली. या अनपेक्षित निवडींमुळे दोन्ही गटांच्या चर्चेतील दावेदारांना ऐनवेळी डावलण्यात आले. दरम्यान, नगरपंचायतीच्या चार विषय समित्यांची सदस्यसंख्या आणि सदस्य यावेळी निश्चित करण्यात आले.नगरपंचायतीच्या कार्यालयात उपजिल्हाधिकारी एस. आर. शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. सभेला प्रशासक तथा तहसीलदार जी. आर. गावीत, नगराध्यक्ष रवींद्र रावराणे, उपनगराध्यक्ष संजय चव्हाण व सर्व नगरसेवक उपस्थित होते.स्वीकृत नगरसेवक पदांसाठी काँग्रेसच्या गटनेत्या संपदा शिवाजी राणे यांनी संताजी अरविंद रावराणे यांचे तर भाजपच्या गटनेत्या सरिता सज्जन रावराणे यांनी सज्जन विनायक रावराणे यांचे नाव सुचविले. त्यानुसार या रावराणे द्वयींच्या नामनिर्देशनपत्रांची छाननी करून ती वैध ठरविण्यात आली. सज्जन रावराणे महाराणा प्रताप शिक्षण संस्थेचे तर संताजी रावराणे श्री कुंभजाई एज्युकेशन सोसायटीचे संचालक असल्याने त्यांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लागली आहे. दुसऱ्या टप्प्यात विषय समित्या आणि समित्यांचे सदस्य निश्चित केले. त्यानुसार उपनगराध्यक्ष हे बाजार, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीचे पदसिद्ध सभापती असणार आहेत. तर सदस्यपदी शोभा उत्तम लसणे (काँग्रेस), समिता संतोष कुडाळकर (काँग्रेस), संतोष शंकर पवार (शिवसेना), संतोष शिवराम माईणकर (भाजप) यांची नावे निश्चित केली आहेत. महिला व बालकल्याण समितीला सभापती आणि उपसभापती अशी दोन पदे असून या समितीसाठी दीपा दीपक गजोबार (काँग्रेस), सुप्रिया राजन तांबे (भाजप), समिता संतोष कुडाळकर (काँग्रेस), सुचित्रा रत्नाकर कदम (भाजप), सार्वजनिक बांधकाम, नियोजन, विकास व पर्यटन समिती:- संपदा शिवाजी राणे (काँग्रेस), उत्तम कौराजी मुरमुरे (काँग्रेस), स्वप्नील बाळकृष्ण इस्वलकर (काँग्रेस), रोहन जयेंद्र्र रावराणे (शिवसेना), रवीद्र्र श्रीधर तांबे (भाजप). आरोग्य वीज शिक्षण व क्रीडा समिती : स्वप्नील बाळकृष्ण इस्वलकर (काँग्रेस), शोभा उत्तम लसणे (काँग्रेस), सरिता सज्जन रावराणे (भाजप), मनिषा गणेश मसूरकर (भाजप) याप्रमाणे समिती सदस्य निवडण्यात आले आहेत. या समित्यांची सभापती निवड येत्या आठवडाभरात केली जाणार आहे. (प्रतिनिधी)इच्छुकांमध्ये नाराजीनगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग पाचमधून संजय दिगंबर सावंत अपक्ष लढण्याच्या तयारीत होते. त्यांना थांबवण्यात आले. तसेच उमेदवारी दाखल केलेल्या डॉ. राजेंद्र पाताडे यांना ऐनवेळी माघार घेण्यास भाग पाडले. त्यामुळे काँग्रेसकडून सावंत, पाताडे या द्वयींपैकी एकाची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लागण्याची शक्यता होती. त्याचप्रमाणे भाजपतर्फे आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे आणि प्राध्यापक एन. व्ही. गवळी यांची नावे चर्चेत होती. त्यानुसार काँग्रेसकडून संजय सावंत व भाजपकडून प्राध्यापक एन. व्ही. गवळी यांची नावे आघाडीवर होती. मात्र, प्रत्यक्ष स्वीकृत नगरसेवक निवडीवेळी दोन्ही गटांची चर्चेतील नावे डावलण्यात आली. त्यामुळे चर्चेतील इच्छुकांमध्ये नाराजी आहे.