शहरं
Join us  
Trending Stories
1
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
2
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
3
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
4
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
5
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
6
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
7
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
8
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
9
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
10
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
11
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
12
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
13
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
14
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
15
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
16
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
17
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
18
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
19
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
20
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान

सावंतवाडीत काँग्रेसची मोर्चेबांधणी

By admin | Updated: October 16, 2015 22:39 IST

नव्या शहर अध्यक्षांच्या शोधात : नगरपालिका निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार

सावंतवाडी : नगरपालिकेची निवडणूक अवघ्या दीड वर्षावर येऊन ठेपल्याने काँग्रेसने आता कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच शहर काँगे्र्रसमध्ये बदल घडवून आणत नव्या दमाच्या कार्यकर्त्याकडे शहर काँग्रेसची धुरा देत जुन्यांना बाजूला करण्याचे काम सुरू केले आहे. त्याचा पहिला फटका शहरअध्यक्ष मंदार नार्वेकर यांना बसला आहे. त्यामुळे आगामी निवडणूक काँग्रेसासाठी प्रतिष्ठेची ठरणार असल्याचे दिसून येत आहे.नगरपालिका निवडणूक अवघ्या दीड वर्षावर येऊन ठेपली आहे. मागील वेळी दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाने काँग्रेसचा सफाया करीत १७च्या १७ जागा खेचून आणल्या होत्या. त्यामुळे तत्कालीन शहरअध्यक्ष अतुल पेंढारकर यांनी पराभवाची जबाबदारी घेत राजीनामा दिला होता. त्यानंतर शहर अध्यक्षाची जबाबदारी मंदार नार्वेकर यांच्या खांद्यावर देण्यात आली होती. मात्र, गेल्या तीन वर्षांत शहरअध्यक्ष मंदार नार्वेकर यांनी पक्षाला चेहरा दिला. मात्र, अपेक्षित अशी आंदोलने तसेच शहरातील विविध प्रश्नावर आवाज उठविण्यात आला नाही. सावंतवाडी शहरात नगरपालिका कोणाच्या ताब्यात आहे. त्यावर सत्ता कोणाची आहे. या राजकीय प्रश्नाबरोबरच शहरात आरोग्याची समस्या, नगरपालिकेने अनेक ठिकाणी निवासी इमारतींना परवानग्या दिल्या. मात्र, त्यांच्या ड्रेनेजची व्यवस्था करण्यात आली नाही. गटारांची साफसफाई करण्यात येत नाही. अशा अनेक समस्या आहेत; पण यावर काँग्रेसने कधी आंदोलन केले नाही तर कधी यावर आवाज उठविला नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्ष नेहमीच निवांत राहिला आहे.सावंतवाडीचे शहरअध्यक्ष मंदार नार्वेकर यांनी कामाच्या व्यापामुळे पक्षाला हवा तसा वेळ देता येत नसल्याने राजीनामा देण्याचे पक्षाच्या बैठकीत सूतोवाच केले होते. त्यामुळे आता पालिका निवडणुकीला अवघे दीड वर्ष राहिले असून, शहर काँग्रेसमध्ये बदल घडवून आणत पुढील काळात जास्तीत जास्त आंदोलन, उपोषणे अशा प्रकारावर काँग्रेस भर देणार असून, भविष्यातील सत्ता ही आपल्या ताब्यात रहावी यासाठी काँग्रेस सर्व प्रयत्न करणार आहे. कारण काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष हे मडूरा येथील असले तरी ते सावंतवाडी शहरातच राहत असल्याने ही पालिका काँग्रेसच्या ताब्यात आली नाही तर काँग्रेस नेते नारायण राणे यांच्याकडे आपले वजन घटू शकते तर पालिका काँग्रेसच्या ताब्यात आली तर संजू परब हे राज्यात हिरो होऊ शकतात कारण आतापर्यंत राज्यमंत्री असलेले दीपक केसरकर यांनी गेली वीस वर्षे सावंतवाडीचे नेतृत्व एकहाती आपल्याकडे ठेवले आहे.आपण नगराध्यक्ष असलो किंवा नसलो तरी नागरिक हे आपल्याच पाठीशी असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे काँग्रेसने पालिका निवडणूक प्रतिष्ठेची केल्यास दीपक केसरकरांचा चांगलाच कस लागणार आहे. (प्रतिनिधी)मूलभूत समस्या : नागरिक संभ्रमातनार्वेकर यांच्या काळात फक्त सावंतवाडीतील गांधी चौकातील रस्त्याच्या प्रश्नावर फक्त एकदाच आवाज उठविला होता. त्यानंतर किंवा त्यापूर्वी एकही आंदोलन हाताळण्यात आले नसल्याने शहरातील नागरिक संभ्रमात आहेत. याचीच दखल घेत काँग्रेसने आता शहर काँग्रेसमध्ये बदल घडविण्याचे ठरविले आहे.