शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
3
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
4
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
5
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
6
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
7
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
8
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
9
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
10
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
11
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
12
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
13
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
14
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
15
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
16
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
17
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
18
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
19
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
20
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO

काँग्रेस कार्यकर्त्यांचा कुडाळात जल्लोष

By admin | Updated: April 19, 2016 00:35 IST

नगरपंचायतीतून विधानसभेचा वचपा काढल्याची भावना : गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, विजयी घोषणांनी परिसर दणाणला

कुडाळ : संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष वेधलेल्या कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवित विधानसभेचा वचपा काढला. या विजयाने काँग्रेस कार्यकर्त्यांनी कुडाळ शहरासह जिल्ह्यात एकच जल्लोष साजरा केला. दरम्यान, नगरपंचायतीवर सत्ता मिळविलेल्या विजयी उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी शहरातून विजयी फेरी काढली. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत विजयी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. कुडाळ नगरपंचायतीची निवडणूक रविवारी झाल्यानंतर सोमवारी सकाळी प्रत्यक्ष दहा वाजता मातमोजणीस सुरूवात करण्यात झाली. मतमोजणी दरम्यान पहिल्या प्रभागातून शिवसेनेचे महेंद्र वेंगुर्लेकर हे निवडून आल्याने शिवसेनेने खाते खोलले. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष सुरू झाला. पण हा आनंद साजरा होतो न होतो तोच प्रभाग दोनमधून काँगे्रसचे ओंकार तेली उमेदवार निवडून आल्याने शिवसेना व काँग्रेसचे कार्यकर्ते जल्लोषासाठी आमनेसामने आले. त्यानंतर पुन्हा शिवसेनेचा उमेदवार विजयी झाल्याने निकालाची शिवसेना कार्यकर्ते आक्रमक होऊन आंनदोत्सव साजरा करू लागले. प्रभाग क्र. ४ नंतर मतमोजणीला सुरूवात झाल्याने काँग्रेसने यश मिळवित प्रभाग क्र. ४, ५, ६ ७ वर लागोलाग काँग्रेसचे उमेदवार विजयी झाल्याने काँगे्रसच्या गोटात जल्लोष कमालीचा जल्लोष सुरू झाला. कार्यकर्त्यांनी परिसरात एकच हुर्यो घातला. दरम्यान, १२ प्रभागापर्यंत मतमोजणी दरम्यान तीन-तीनच्या फरकाने शिवसेनेची एक जागा विजयी झाली. शिवसेना व कॉंग्रेस यांच्या चढाओढीने १३ प्रभागांची मतमोजणीमध्ये भाजपने आपले खाते खोलले. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे पडसाद उमटू लागले. भाजपचे कार्यकर्ते जल्लोषासाठी एकत्र जमू लागल्याने पुढील जागांसाठी भाजपचेच उमेद्वार येतील, अशी आशा बाळगून होते. मात्र पुन्हा काँग्रेस व शिवसेना यांच्याच उमेदवारांनी बाजी मारल्याने भाजपच्या आशेचा भंग झाला आहे. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते निकालस्थळावरून काढता पाया घेतला. मात्र काँग्रेस व शिवसेना यांच्यात शेवटपर्यंत जल्लोष सुरू राहीला. प्रभाग सोळाच्या मतमोजणीनंतर काँग्रेस - ८, शिवसेना - ६, भाजप- १, अपक्ष- १ असा निकाल जाहीर लागला. त्यामुळे प्रभाग क्र. १७ चा उमेद्वार कोणत्या पक्षाचा येईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. काँग्रेसचे जरी आठ उमेद्वार विजयी झालेले असले तरी विजयी अपक्ष उमेद्वार हा शिवसेना पुरस्कृत व भाजपच्या एका विजयी उमेद्वारासोबत युती करता येईल, अशी आशा भाजपा व सेना कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती. यावेळी प्रभाग सतराच्या मतमोजणीवेळी जल्लोषाला थोडा आवर बसून सर्वत्र एकच शांतता पसरली होती. शेवटच्या १७ क्रमांकाच्या प्रभागातील विजयी उमेद्वार काँग्रेसचा विनायक राणे विजयी झाल्यानंतर काँग्रेस - ९, शिवसेना - ६, भाजप - १, अपक्ष - १ अशा जागा राहिल्या. यामुळे थंड झालेले जल्लोषाचे वारे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा आपल्या जल्लोषाने वादळात रूपांतरीत केले. काँग्रेसला मिळालेल्या बहुमतामुळे जिल्ह्यातील पदाधिकारी कुडाळमध्ये एकत्र जमून आनंदोत्सवात सामिल झाले. दिवसभराच्या जल्लोषानंतर सायंकाळच्या सुमारास शहरातून उमेदवारांनी विजयी फेरी काढली. यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीसह गुलालाची उधळण करीत विजयी उमेद्वारांनी प्रभागामध्ये जाऊन मतदारांचे आभार मानले. यावेळी काँग्रेस नुतन जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, माजी अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, दिपलक्ष्मी पडते, अशोक सावंत, कुडाळ तालुकाध्यक्ष दिनेश साळगावकर, विकास कुडाळकर, व्हिक्टर डांन्टस, युवक काँग्रेसचे अध्यक्ष आनंद शिरवलकर, रूपेश पावसकर, राकेश कांदे, सुनील भोगटे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब, पंचायत समिती सभापती प्रमोद सावंत, आनंद शिरवलकर, मंदार नार्वेकर, संदीप कुडतरकर, प्रेमानंद देसाई, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, विशाल परब, संदीप सुकी यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)मतमोजणी प्रक्रिया शांततेत : तहसील कार्यालयाला पोलिसांचे कडेमतमोजणी सुरू असलेल्या कुडाळ तहसीलदार कार्यालया भोवती पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कार्यालयामध्ये मुख्य लोकप्रतिनिधी, ठराविक माध्यमांचे प्रतिनिधी व मोजकेच कार्यकर्ते यांना सोडण्यात आल्याने कार्यालयातही शिस्तबद्धता दिसून आली. कार्यालयाभोवती पोलीसांनी कडे केल्याने कसलाही गोंधळ माजला नाही.कुडाळ नगरपंचायतीचा निकालादिवशी पोलीसांमार्फत कडक बंदोबस्त ठेवल्याने शहरात कुठेही वादाचा प्रसंग उद्भवला नाही. कुडाळ नगरपंचायतीची पहीलीच निवडणूक सुरवातीपासून निकालापर्यंत अगदी शेवटपर्यंत शांततेत पार पडल्याने प्रशासनासह लोकप्रतिनिधीं व नागरीकांतून समाधान व्यक्त होत आहे. निकाल, उत्सुकता आणि घालमेलमतमोजणीस सुरूवात झाल्यानंतर सुरवातीला शिवसेना, भाजपा व काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतमोजणी ठिकाणी गर्दी केली होती. सुरूवातीला शिवसेना व नंतर काँग्रेसच्या उमेदवारांनी बाजी मारली. पण हि बाजी फेरा फेरावर मारल्याने सर्वच गटात अखेरपर्यंत कार्यकर्त्यांची घालमेल पाहावयास मिळाली.