शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

काँग्रेस, शिवसेना सदस्यांत खडाजंगी

By admin | Updated: December 1, 2015 00:17 IST

कुडाळ पंचायत समिती सभा : वैभव नाईक अभिनंदन ठरावावरुन वाद

कुडाळ : हिर्लोक प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका आली नसताना आमदार वैभव नाईक यांच्या अभिनंदनाचा ठराव कसा काय घेतला? असा प्रश्न उपस्थित करत हा ठराव घेण्यात येवू नये अशी भूमिका कॉंग्रेसचे पंचायत समिती सदस्य दिपक नारकर यांनी कुडाळ पंचायत समितीच्या बैठकीत केली. या मुद्यावरून दिपक नारकर व शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य बबन बोभाटे यांच्यात खडाजंगी झाली. यानंतर बहुमताने हा अभिनंदनाचा ठराव नामंजूर करण्यात आला.कुडाळ पंचायत समितीची मासिक सभा पंचायत समितीच्या सभागृहात सोमवारी संपन्न झाली. या सभेला सभापती प्रतिभा घावनळकर, उपसभापती आर.के सावंत, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सदस्य व अधिकारी वर्ग उपस्थित होते. सुरुवातीला शहीद झालेल्या सातारा येथील जवान कर्नल संतोष महाडिक यांना आदरांजली वाहण्यात आली.सभेत हिर्लोक प्राथमिक आरोग्य केंद्राला अजूनही रुग्णवाहिका आलेली नसतानाही मागच्या मासिक सभेत अगोदरच आमदारांचा अभिनंदनाचा ठराव कसा काय घेतला? असा प्रश्न दिपक नारकर यांनी उपस्थित करत सदरचा ठराव नामंजूर करण्यात यावा अशी भूमिका मांडली.यावरून शिवसेनेचे बबन बोभाटे व नारकर यांच्यात खडाजंगी झाली यावेळी बोलताना बोभाटे म्हणाले की, हिर्लोक प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका देणेत यावे याकरिता आमदार वैभव नाईक यांनी आपल्या निधीतून रुग्णवाहिका मंजूर केली असून तसे पत्र जिल्हानियोजनाकडून पुढील कार्यवाही जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य विभाग यांच्या कडे दिलेले आहे. रुग्णवाहिका येणारच आहे फक्त काही प्रक्रियेमुळे अजून थोडा कालावधी लागणार आहे असे त्यांनी सांगितले.यावरून रुग्णवाहिका येण्याअगोदरच का अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला हा ठराव नामंजूर करावा अशी भूमिका नारकर यांनी घेतल्यानंतर सभापती व उपस्थितांमधील पंचायत समिती सदस्यांच्या बहुमतांनी हा पूर्वी घेतलेला अभिनंदनाचा ठराव नामंजूर करण्यात आला.गेले काही महिने शालेयपोषण आहार ठप्प आहे बरेच शिक्षक सायंकाळी शाळा सुटायच्या अगोदर शाळेच्या बाहेर असतात यावर शिक्षण विभागाचे नियंत्रण नसल्याचे पं.स किशोर मर्गज यांनी निदर्शनास आणून दिले.तसेच गटशिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार सद्या सावंतवाडीच्या गटशिक्षणाधिकारी यांच्या जवळ आहे.सदरचा कार्यभार कुडाळच्या बाक्रे यांच्याकडे देण्यात यावा, अशीही मागणी करणेत आली.पर्यावरण ग्रामसमृद्धी योजनेंतर्गत आलेल्या ४ कोटी ५० लाखांची माहिती सभेत द्यावी, अशी मागणी सदस्यांनी केली. पुढील सभा घावनळे येथे सभापतीच्या मतदारसंघात घेण्याचे ठरले. भातपीक स्पर्धेत डिगस येथील अनंत चंद्रकांत तावडे यांचा प्रथम तर ज्ञानेश्वर माईणकर यांचा द्वितीय क्रमांक आला. त्यांचेही अभिनंदन करण्यात आले. (प्रतिनिधी)नेमकी भूमिका काय?मागच्या सभेत सभापती घावनळकर यांच्याच अध्यक्षतेखाली रुग्णवाहिका संदर्भात आमदारांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला होता. आज सभापतींच्याच अध्यक्षतेखाली हा ठराव नामंजूर करण्यात आला त्यामुळे सभापती घावनळकर यांची नेमकी भूमिका काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.