शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
2
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
3
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
4
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
5
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
6
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
7
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
8
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
9
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
10
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
11
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
12
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
13
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
14
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी
15
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
16
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
17
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!
18
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
19
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
20
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...

दोडामार्गात काँगे्रसचा ‘दे धक्का’

By admin | Updated: November 25, 2015 00:41 IST

नानचे नगराध्यक्ष : कोरगावकर उपनगराध्यक्षा; भाजपची निराशा

दोडामार्ग : कसई-दोडामार्ग नगरपंचायतीत संख्याबळ कमी असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सेना, भाजप व मनसेच्या प्रत्येकी एका सदस्याला हाताशी धरून ‘वन टू का फोर’ करत नाट्यमयरित्या सत्ता स्थापन केली. नगराध्यक्षपदी काँगे्रसचे संतोष नानचे, तर उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या साक्षी कोरगावकर यांची निवड झाली. या निवडणुकीत भाजप पहिल्यांदा आपल्याच पक्षाचा नगराध्यक्ष निवड करण्यासाठी मनसुबे रचत होता. पण काँग्रेसच्या डावपेचात भाजपची घोर निराशा झाली. कसई-दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीत काँगे्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे १७ पैकी ६ नगरसेवक निवडून आले होते. तर सेना-भाजपचे प्रत्येकी ५ प्रमाणे १० संख्याबळ नगरपंचायतीत होते. मनसेचा एकमेव नगरसेवक निवडून आला होता. युतीचे १० संख्याबळ असल्याने याठिकाणी युतीचा नगराध्यक्ष बसेल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ऐनवेळी शिवसेनेच्या नगरसेविका संध्या प्रसादी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यांच्या नाराजीचा फायदा काँग्रेसला मिळेल, असा अंदाज वर्तविला जात होता आणि त्यानंतरच राजकीय समीकरणे बदलली. संध्या प्रसादी, भाजपच्या नगरसेविका रेश्मा कोरगावकर व मनसेचे नगरसेवक रामचंद्र ठाकूर हे काँग्रेसच्या गळाला लागले. हे तीन व आघाडीचे सहा असे नऊ नगरसेवक सोमवारी रात्री अज्ञातवासात होते. ते मंगळवारी थेट निवडणुकीसाठी दाखल झाले. (प्रतिनिधी)वैभववाडी नगराध्यक्षपदी रावराणेवैभववाडी : वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे रवींद्र्र रावराणे विराजमान झाले. त्यांनी शिवसेनेचे रोहन रावराणे यांचा एका मताने पराभव केला. तर भाजपच्या सुचित्रा कदम यांना पराभूत करत काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय चव्हाण उपनगराध्यक्षपदी विराजमान झाले. दोन्ही निवडी अपेक्षेप्रमाणे झाल्याने काँग्रेसने आतषबाजी केली. राज्यातीलअनोखे उदाहरणदोडामार्ग नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षपदी काँग्रेसचे संतोष नानचे मंगळवारी विराजमान झाले. नानचे हे काँग्रेसचे नगराध्यक्ष असले तरी त्यांना राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आणि मनसे या प्रमुख चार पक्षांचा पाठिंबा लाभला आहे. यात भाजप व सेनेच्या प्रत्येकी एका बंडखोर सदस्याने नानचे यांना मतदान केल्यामुळे सर्वपक्षीय पाठिंब्यावर नगराध्यक्ष झाल्याचे हे अनोखे उदाहरण बनले आहे.