शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

काँग्रेस जिल्हाध्यक्ष सावंत यांचा राजीनामा

By admin | Updated: November 6, 2014 00:19 IST

प्रदेशाध्यक्षांना सादर : पराभवाची नैतिक जबाबदारी

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीमध्ये तीनपैकी दोन मतदारसंघांत काँग्रेसचा पराभव झाल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा काँगे्रस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली. पदाचा राजीनामा दिला असला तरी काँग्रेस पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.सिंधुदुर्ग काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी आज, बुधवारी ओरोस येथे पत्रकार परिषद घेऊन आपल्या पदाच्या राजीनाम्याबाबत माहिती दिली. यावेळी सावंत म्हणाले की, २८ जुलै २०१० रोजी काँग्रेस नेते नारायण राणे व माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाची धुरा आपल्यावर सोपविली. गेली चार वर्षे राष्ट्रीय काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी काम करीत आहे. या काळात काँग्रेस पक्षाच्या संघटना बांधणीसाठी प्रामाणिकपणे व निष्ठेने काम केले. लोकसभा निवडणुकीमध्ये माजी खासदार नीलेश राणे यांचा पराभव झाला. यावेळी या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायचे निश्चित केले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभेच्या पराभवाची पोकळी भरून काढण्याची आशा होती. ही आशाही फोल ठरली. विधानसभा निवडणुकीमध्ये कणकवली विधानसभा मतदारसंघात आ. नीतेश राणे यांचा विजय झाला, परंतु ज्यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्षे काम केले, त्या नारायण राणे यांचा पराभव झाला. त्याशिवाय सावंतवाडी मतदारसंघातूनही काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत गावडे यांचाही पराभव झाला. जिल्ह्यातील तीनपैकी दोन मतदारसंघांत काँग्रेसचा पराभव झाल्याने त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती यावेळी सतीश सावंत यांनी दिली.जिल्हाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत जिल्ह्यातील सर्व काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे चांगले सहकार्य लाभले. नारायण राणे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचे प्रेम मिळाले. म्हणून चार वर्षे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळू शकलो.