शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
2
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
3
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
4
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
5
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
6
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
7
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
8
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय
9
IND W vs AUS W Semi Final Live:हीच ती वेळ! कांगारूंची शिकार करत टीम इंडियाच्या वाघीणीं फायनल गाठणार?
10
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
11
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
12
"माझ्या मुलीचं काय होईल?" जावयाने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
अमेरिकेतील Rate Cut चा परिणामच नाही... उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले
14
मिथुन चक्रवतींच्या सुनेसोबत साऊथ इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचा प्रकार, म्हणाली- "१७ वर्षांची असताना..."
15
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
16
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
17
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
18
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
19
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
20
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू

‘भाजप’ सरकारविरोधात काँग्रेसचा मोर्चा

By admin | Updated: May 31, 2016 00:36 IST

मालवण येथे ‘अच्छे दिना’ची पुण्यतिथी : भाजपकडून दोन वर्षांत जनतेची फसवणूक

मालवण : भाजप सरकारने दोन वर्षांत जनतेची फसवणूक केली आहे. देशातील सामान्य नागरिक तसेच गरिबांना वेगवेगळ्या योजनांची आमिषे दाखवून भाजप सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. चिपी विमानतळ व सी-वर्ल्ड प्रकल्पाबाबत स्थानिकांमध्ये संभ्रमावस्था करण्याचे काम सरकार करत आहे. याचा निषेध म्हणून मालवण तालुका काँग्रेसतर्फे सोमवारी मालवण तहसील कार्यालयाबाहेर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाजपच्या दोन वर्षांच्या ‘अच्छे दिना’ची पुण्यतिथी साजरी करताना केंद्र व राज्यातील भाजप-युती सरकारवर जोरदार टीका केली. दरम्यान, देशात महागाई तसेच इतर जनतेच्या विविध प्रश्नांबाबत नायब तहसीलदार एस. पी. खडपकर यांना निवेदन निवेदन देण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यात मनाई आदेश लागू असताना जमाव करून मोर्चा काढल्याप्रकरणी ३० ते ३५ काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष मंदार केणी, पंचायत समिती सभापती हिमाली अमरे, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, बाळू कोळंबकर, शहर अध्यक्ष लीलाधर पराडकर, मोहन वराडकर, राजा गावडे, उमेश मांजरेकर, संजय लुडबे, सुधीर साळसकर, अनिल कांदळकर, उदय परब, बाबू कांदळकर, अनिल न्हिवेकर, राजू परुळेकर, जिल्हा परिषद सदस्य संजीवनी लुडबे, चित्रा दळवी, सीमा परुळेकर, भाग्यता वायंगणकर, ममता वराडकर, महानंदा खानोलकर यांच्यासह तालुक्यातील शेकडो काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.केणी म्हणाले, भाजप-युती सरकारबाबत जनतेच्या मनात असंतोष आहे. गरीब जनतेला चांगल्या सुविधा देऊ अशी स्वप्नेच जनतेला दाखवली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप सरकारकडे कोणतेही ‘व्हिजन’ नाही. स्थानिक प्रशासन चुकीच्या पद्धतीने कारभार हाकत आहे. त्यामुळे भाजप सरकारच्या दोन वर्षांच्या वर्षपूर्तीनिमित ‘अच्छे दिना’ची पुण्यतिथी करण्यात आली. (प्रतिनिधी)खोट्या आश्वासनांबाबत जागृती करणारजिल्हाध्यक्ष सावंत म्हणाले, भाजपने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. केवळ अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून जनतेचा भ्रमनिरास केला आहे. शेतकरी, गरीब जनता निष्क्रिय लोकप्रतिनिधींना कंटाळली आहे. जिल्ह्याला लाभलेले पालकमंत्री चिपी विमानतळावर २०१७ ला विमान झेपावणार अशी खोटी आश्वासने देत आहेत. सरकारच्या या धोरणांबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्याची वेळ आली आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना अपेक्षित विकासाचे धोरण आम्ही पूर्ण करून दाखवू. भविष्यात महागाई कमी न झाल्यास जनतेच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा सामंत यांनी दिला.