शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

गोवेरीत काँग्रेसचा झेंडा

By admin | Updated: August 7, 2015 23:54 IST

सरपंचपदी सदफ खुल्ली : सत्यवान गावडे उपसरपंच

कुडाळ : गोवेरी ग्रामपंचायतीवर काँगे्रसचा तिरंगा फडकला असून अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या गोंद्याळ येथील सदफ मुश्ताक खुल्ली या महिलेची सरपंचपदी, तर सत्यवान यशवंत गावडे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली. बुधवारी कुडाळ तालुक्यात नऊ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुका झाल्या; पण गोवेरी सरपंच व उपसरपंच पदांकरिता कोणीच ग्रामपंचायत सदस्य बुधवारी ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित न राहिल्याने ही निवडणूक तहकूब करून गुरुवारी घेण्यात आली. त्याप्रमाणे गोवेरी ग्रामपंचायतीची सरपंच, उपसरपंच पदासाठी निवडणूक पार पडली. सरपंच म्हणून सदफ मुश्ताक खुल्ली या महिलेची तर उपसरपंचपदी सत्यवान यशवंत गावडे यांची निवड करण्यात आली. यावेळी सोनाली गावडे, सत्यवान हरमलकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)प्रथमच मुस्लिम समाजाला सरपंचपदएकूण सात सदस्य संख्या असलेल्या गोवेरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सदफ खुल्ली या मुस्लिम समाजाच्या महिलेच्यावतीने प्रथमच मुस्लिम समाजाला गोवेरी गावचे सरपंचपद भूषविण्याची संधी मिळाली आहे. खुल्ली यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विकास कुडाळकर, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष रूपेश पावसकर, सरंबळ माजी सरपंच अजय कदम यांनी निवड झालेल्यांचे अभिनंदन केले. भाजप तालुकाध्यक्षांना धक्कागोवेरी ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य व भाजपचे विद्यमान कुडाळ तालुकाध्यक्ष बब्रुवान भगत यांनी ही ग्रामपंचायत भाजपकडेच राखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र, या ग्रामपंचायतीवर काँग्रेसने पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित करीत भाजप तालुकाध्यक्ष भगत यांना धक्का दिला आहे.