शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या कामामुळे काँग्रेस घाबरली

By admin | Updated: July 23, 2016 23:47 IST

राजन तेली यांची टीका : हिंमत असेल तर खुलेआम पुतळा जाळा

दोडामार्ग : मुख्यमंत्र्यांनी आपल्या कामाचा ठसा कमी वयात आणि कमी कालावधीत उमटविला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्यानेच मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्यासारखे भ्याड कृत्य करण्यात आले. त्याचा आम्ही निषेध करतो. त्यांच्यात धमक असती, तर खुलेआम हे कृत्य केले असते. यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा भाजपाचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी दिला.येथील भाजपाच्या संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा सरचिटणीस यशवंत आठलेकर, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर, तालुकाध्यक्ष संदीप नाईक, चेतन चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस उपस्थित होते.यावेळी बोलताना तेली म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने महाराष्ट्राला तरूण मुख्यमंत्री लाभले आहेत. त्यांनी कमी कार्यकाळात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला असल्याने काँगे्रस कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळेच त्यांनी पुतळा जाळण्याचा प्रकार केला. हे कृत्य भ्याडपणाचे आहे. त्यांच्यात जर हिंमत असती, तर चोरीछुपे असे कृत्य केले नसते. यापुढे असे प्रकार जिल्ह्यात खपवून घेतले जाणार नाहीत. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या तोंडावर असे कृत्य करणे, घरातून पळून जाणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे. जर पुतळा जाळला, तर खुलेआम सांगा. नाहीतर आम्ही हे केले नाही, असे तरी जाहीर करा. याबाबत पोलिसांशी चर्चा करून माहिती घेतली आहे. पोलिसांनी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आमचा आणखी काही व्यक्तींवर संशय आहे. पोलिसांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांनाही अटक करावी. रविवारपर्यंत जर अटक केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल, असा इशारा राजन तेली यांनी दिला. जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर यांनी अशी प्रवृत्ती जिल्ह्यात खपवून घेतली जाणार नाही, असे सांगितले.(प्रतिनिधी)