शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

किल्ला प्रवासी होडी वाहतूकीस सशर्त परवानगी : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 15:51 IST

Sindhudurg port, collector, fort, ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग दर्शन घडविणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेस होडी वाहतूक सुरू करण्यास अटी, शर्ती घालत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे पर्यटकांना आता किल्ला दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.

ठळक मुद्देकिल्ला प्रवासी होडी वाहतूकीस सशर्त परवानगी : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशप्रवासी होडी वाहतूक संघटनेसह आमदार नाईक यांचा पाठपुरावा

मालवण : ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग दर्शन घडविणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेस होडी वाहतूक सुरू करण्यास अटी, शर्ती घालत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे पर्यटकांना आता किल्ला दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मार्च महिन्यापासून किल्ला प्रवासी होडी वाहतूक सेवा बंद करण्यात आली होती. शासनाने अनलॉक करत पर्यटन सुरू केल्यानंतरही येथील किल्ला प्रवासी वाहतूकीस परवानगी मिळाली नव्हती. त्यामुळे येथे पर्यटनास येणाऱ्या पर्यटकांना बंदर धक्का येथूनच किल्ला दर्शन घेत माघारी परतावे लागत होते. त्यामुळे त्यांच्यातून नाराजी व्यक्त होत होती.प्रवासी होडी वाहतूक संघटनेने परवानगी मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. याबाबत संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत यांच्यासह अन्य सदस्यांनी स्थानिक आमदार वैभव नाईक यांच्याकडेही पाठपुरावा केला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी काही अटी, शर्थी घालत प्रवासी बोट वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आमदार नाईक यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.प्रवासी बोट वाहतूक संघटनेने प्रत्येक दिवशी एका बोटीच्या दोन फेऱ्या माराव्यात, सामाजिक अंतर, सॅनिटायझर करणे, पर्यटकांना सुरक्षिततेच्या सूचना देणे आवश्यक आहे. बुकिंगच्या ठिकाणी सामाजिक अंतर राखण्याबाबत खुणा माराव्यात, प्रवाशांच्या सर्व नोंदी, पंधरा दिवसाच्या प्रवासाची माहिती घ्यावी, बुकिंगच्या ठिकाणी ई-पेमेंट सुविधा द्यावी, ऑनलाईन बुकिंगसाठी प्राधान्य द्यावे, प्रवाशांचे तापमान, ऑक्सिजन पातळीत बदल दिसल्यास अशा प्रवाशांना प्रवास करण्यास प्रतिबंध करावा, तिकीट विक्रीच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी सुरक्षिततेच्या साहित्याचा वापर करणे बंधनकारक राहील, बोटमन तसेच पर्यटकांनी मास्क, फेसशिल्ड वापरणे बंधनकारक असेल. सहली, समूहांना प्रतिबंधएका बोटीमध्ये सामाजिक अंतर पाळत केवळ सहा प्रवाशांना प्रवेश द्यावा, सहली व मोठ्या समूहांना एकत्रित प्रवास करण्यास प्रतिबंध असेल. प्रत्येक फेरीनंतर बोट निर्जंतुक करणे आवश्यक असेल. प्रवासी बीट वाहतूकीसाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या घेणे बंधनकारक राहील अशा अटी, शर्ती घालण्यात आल्या आहेत. याचे उल्लंघन झाल्यास भारतीय दंडसंहिता १८६० (४५) कलम १८८ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथरोग नियंत्रण कायदा १८९७ मधील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

टॅग्स :FortगडSindhudurg portसिंधुदुर्ग किल्लाcollectorजिल्हाधिकारी