शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘वन बूथ टेन युथ’ संकल्पना राबविणार

By admin | Updated: July 23, 2016 00:19 IST

कणकवली मतदारसंघात : रावराणे

 वैभववाडी : बूथ केंद्र्रबिंदू मानून संघटनात्मक पुनर्बांधणीसाठी राष्ट्रीय नेतृत्वाच्या ‘वन बूथ ; टेन युथ’ संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी कणकवली विधानसभा मतदारसंघात २३ जुलै ते १४ आॅगस्ट याकालावधीत ‘बूथ संपर्क अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाची सुरुवात जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कणकवली तालुक्यातील हरकुळ येथून शनिवारी (दि. २३) करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.भाजप संपर्क कार्यालयात रावराणे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष जेष्ठ नगरसेवक सज्जन रावराणे, तालुकाध्यक्ष राजेंद्र्र राणे, रंगनाथ नागप, तालुका संघाचे संचालक अनंत फोंडके आदी उपस्थित होते. रावराणे म्हणाले की, जिल्ह्यात संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने प्रमुख पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार विधानसभेच्या कणकवली मतदार संघाची जबाबदारी आपल्यावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण कणकवली वैभववाडी व देवगड तालुक्यात बूथ संपर्क अभियानाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.रावराणे पुढे म्हणाले की, २३ ते ३० जुलै कणकवली, १ ते ३ आॅगस्ट वैभववाडी आणि ४ ते १४ आॅगस्ट देवगड तालुक्यात बूथ संपर्क अभियानाचे नियोजन करण्यात आले आहे. या अभियान दौऱ्यात जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी आमदार अ‍ॅड अजित गोगटे, जयदेव कदम, सदाशिव ओगले, राजश्री धुमाळे, प्रज्ञा ढवण तसेच तिन्ही तालुकाध्यक्ष व स्थानिक पदाधिकारी सहभागी होणार आहेत. या अभियानानिमित्त प्रत्येक बूथस्थरीय कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केंद्र्र व राज्य सरकारच्या विविध लोकोपयोगी योजना जनतेपर्यंत पोचविणे व त्या योजनांचा अधिकाधिक लोकांना लाभ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.त्याचप्रमाणे गावागावातील प्रलंबित विकास कामांचा आढावा घेऊन पाठपुरावा केला जाणार आहे. तसेच योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बूथस्थरीय कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या बूथ समित्यांचे पुनर्गठन करुन आगामी निवडणुकांसाठी संघटन अधिक मजबूत केले जाणार आहे, असे रावराणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)प्रवेशोच्छुक कार्यकर्त्यांशी चर्चा करणारअन्य पक्षातील काही प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. बूथ संपर्क अभियानाच्या निमित्ताने या लोकांना भेटून त्यांच्याशी चर्चा करुन पक्ष प्रवेश निश्चित करण्याचा प्रयत्न राहणार आहे. हे बूथ संपर्क अभियान आगामी जिल्हा परिषद व देवगड नगरपंचायतीच्या निवडणूकीची पूर्वतयारी आहे, असे भाजप जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे यांनी स्पष्ट केले.