शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

संगणक साक्षरतेचे धडे झाले स्वीच आॅफ

By admin | Updated: April 18, 2015 00:01 IST

जिल्हा परिषद : प्राथमिक शाळांसाठीचे लाखो रुपये पाण्यात

रहिम दलाल - रत्नागिरी-आजकाल सर्वच व्यवहार संगणकद्वारे केले जात असताना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये संगणक असूनही अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना संगणकीय प्रशिक्षण दिले जात नसल्याने ते धूळखात पडले आहेत. जिल्ह्यातील ३४१ प्राथमिक शाळांमधील संगणक बंद अवस्थेत असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी अनुदान नसल्याने संगणक केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. संगणकीय युगामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे, यासाठी लाखो रुपये खर्चून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शासनातर्फे संगणक संच देण्यात आले. त्यासाठी लोकवर्गणी आणि सर्व शिक्षा अभियानातून खर्च करण्यात आला. विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून संगणकाचे ज्ञान मिळाल्यास त्यांना भविष्यात फायदा होणार असल्याचे ध्येय समोर ठेवण्यात आले. त्यासाठी शिक्षकवर्गालाही एमएससीआयटी कोर्स करण्याची सक्ती करण्यात आली. तरीही आज जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील सुमारे २० टक्के शिक्षकांनी एमएससीआयटी प्रशिक्षण घेतलेले नाही. संगणकीय युग असल्याने विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच संगणकीय ज्ञान मिळावे, यासाठी शासनाने प्राथमिक शाळांमध्ये संगणकाचे धडे देण्यास सुरुवात केली. बँकांचे व्यवहार, शासकीय कामकाजामध्ये संगणकाचा वापर तसेच खासगी कंपन्यांमध्ये कामकाजही संगणकाद्वारे केले जात असल्याने आता संगणक वापराशिवाय पर्याय उरलेला नाही. म्हणून विद्यार्थ्यांनाही संगणकीय प्रशिक्षण देणे क्रमप्राप्त झाले आहे. ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या २७३३ प्राथमिक शाळा आहेत. त्यापैकी १२७९ शाळांना संगणक संच शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. त्यामध्ये काही संगणक संच लोकवर्गणीतून, तर बहुतांश संगणक संच सर्व शिक्षा अभियानातून शाळांना देण्यात आले आहेत. सन २००३-२००४ ते सन २०१२-१३ या कालावधीमध्ये संगणकांचे वाटप करण्यात आले होते. या संगणकांपैकी बहुतांश संगणक संच कालबाह्य झाले आहेत. यामधील बंद असलेल्या संगणकांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून अनुदान मिळत नाही. त्यामुळे संगणकांच्या दुरुस्तीसाठी खर्च कोण करणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. बंद असलेल्या संगणक संचाची दुरुस्ती करण्यास कोणी प्रयत्न केल्यास त्यासाठी लागणारे पार्टही मिळत नाहीत. त्यामुळे संगणक असूनही ते केवळ शोभेच्या वस्तू बनल्या असून लाखो रुपये पाण्यात गेले आहेत तर संगणक शिक्षणाचा बोऱ्या वाजला आहे. जिल्हा परिषदेने संगणक प्रशिक्षणाचा केलेला प्रयत्न आता निष्फळ ठरला आहे.या संगणकांमध्ये ३४१ शाळांमधील संगणक संच बंद असून, त्यांची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे आहे. तालुकाचालू बंद एकूणचिपळूण१०९ ४५ १५४दापोली ९५ २५ १२०गुहागर१३० ४८ १७८खेड१३४ ४२ १७६लांजा ७१ १५ ९६मंडणगड ५० १३ ६३राजापूर१११ ६३ १७४रत्नागिरी१२२ ३९ १६१संगमेश्वर१०६ ५१ १५७एकूण-९३८ ३४१ १२७९ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत प्राथमिक शाळांचे मूल्यांकन केले जाते. त्यामध्ये इंटरनेट, ई-मेल, संगणकाद्वारे पत्रव्यवहार, ई-लायब्ररी असे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी संगणकाद्वारे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. मात्र, अनेक शाळांमध्ये संगणक असूनही तेथे प्रशिक्षण दिले जात नाही. लाखो रुपयांचा खर्च करून सामान्य विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने ज्या घाईने घेतला, त्या तत्परतेने त्याच्या देखभाल खर्चाची तरतूद केली नाही.जिल्हा परिषदेच्या ३४१ शाळांमधील संगणक बंद.१४५४ शाळांमध्ये संगणक नाहीत.दुरुस्तीसाठी अनुदान मिळत नाही.२० टक्के शिक्षक एमएससीआयटी प्रशिक्षणाविना.संगणक असून विद्यार्थी प्रशिक्षणापासून दूर.२७३३ पैकी १२७९ शाळांमध्ये संगणक.