शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: नरकासुरवधाचे स्पर्धात्मक सादरीकरण, फणसनगर येथील सद्गुरु मित्रमंडळ प्रथम क्रमांकाचे मानकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 19:08 IST

लक्षवेधी, डोळ्याचे पारणे फेडणारे सादरीकरण

कणकवली : कणकवली तेलीआळी- हर्णे आळी येथील सुदर्शन मित्रमंडळाच्यावतीने आयोजित नरकासूर स्पर्धेत वरवडे,फणसनगर येथील सद्गुरु मित्रमंडळ प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. कणकवली तेलीआळी डी.पी.रोड कॉर्नर येथे संत जगनाडे महाराज चौकात  नरकचतुर्दशीच्या पूर्वसंध्येला नरकासूर स्पर्धेचे आयोजन कणकवली येथील सुदर्शन मित्रमंडळच्यावतीने करण्यात आले होते. या स्पर्धेत २० संघ सहभागी झाले होते.या संघांनी नरकासूराची प्रतिकृती पौराणिक कथेनुरूप सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. अनेक प्रतिकृती लक्षवेधी ठरल्या.या नरकासूर स्पर्धेत द्वितीय क्रमांक सुदर्शन मित्रमंडळ, कणकवली व भगवती मित्रमंडळ, आंब्रड यांना विभागून देण्यात आला. तर तृतीय क्रमांक कणकवली येथील पटकीदेवी मित्र मंडळ व स्वराज्य मित्रमंडळ, जळकेवाडी, कणकवली यांना  देण्यात झाला. उत्तेजनार्थ पारितोषिक दत्तमंदिर मित्रमंडळ परबवाडी, श्री स्वयंभू मित्रमंडळ, कणकवली, जागृत मित्रमंडळ, नवयुग मित्रमंडळ यांना देण्यात आले. तसेच प्रत्येक सह‌भागी संघाना चषक व रोख ५०० रूपये देवून गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून गजानन उपरकर, प्रा. हरिभाऊ भिसे व सुधिर हर्णे यांनी काम पाहिले.लक्षवेधी, डोळ्याचे पारणे फेडणारे सादरीकरणया स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सुदर्शन मित्र मंडळाच्या सर्व कार्यकत्यांनी विशेष  मेहनत घेऊन स्पर्धा यशस्वी केली. रात्री उशिरापर्यंत ही स्पर्धा रंगली होती. नरकासुर पाहण्यासाठी नागरिकांनी तेली आळी येथे गर्दी केली होती. ढोल ताशांच्या गजरात नरकासुरांची धिंड काढण्यात आली. विविध संघांनी आपण तयार केलेल्या नरकासूराच्या प्रतिकृती वाजत,गाजत स्पर्धेच्या ठिकाणी आणल्या. तसेच श्रीकृष्णाच्या विविध लीलांचे सादरीकरण करण्यात आले. दशावतार नाट्यकृतींचा आधारही नरकासुर वधाचे कथानक सादर करताना घेण्यात आला. त्यामुळे ते लक्षवेधी ठरले. संदेश तांबे यांनी स्पर्धेचे सूत्रसंचालन केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Sindhudurg: Phansanagar's Sadguru Mandal wins Narakasur competition with captivating performance.

Web Summary : Sadguru Mandal of Phansanagar won the Narakasur competition organized by Sudarshan Mitramandal. The event featured vibrant Narakasur effigies and Krishna's tales, captivating the audience with theatrical performances. Sudarshan Mitramandal and Bhagwati Mitramandal jointly secured the second position.