शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
3
बलुचिस्तानात मोठा खेला...! सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग; भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला
4
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
5
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
6
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
7
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
8
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
9
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
10
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
11
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
12
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
13
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
14
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
15
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
16
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
18
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
19
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
20
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?

नुकसानभरपाई हायजॅक

By admin | Updated: December 4, 2014 23:49 IST

वसंत सरवणकर यांचा आरोप : देवगड पंचायत समिती सभा

देवगड : आंबा नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमांचे पुढे काय होते याचे प्रातिनिधीक स्वरूपातील एक प्रकरण माजी सभापती वसंत सरवणकर यांनी सभागृहापुढे आणताच तालुका कृषी कार्यालयाचा भोंगळ कारभार सर्वांच्या नजरेसमोर आला. देवगड पंचायत समितीच्या मासिक सभेमध्ये गुरुवारी दुपारी वसंत सरवणकर यांनी फणसगांव परिसरातील एका शेतकऱ्याची नुकसानभरपाई म्हणून सरकारतर्फे त्याला देण्यात आलेला सहा हजारांचा चेक तालुका कृषी विभागाने चक्क हायजॅक केल्याचा खळबळजनक आरोप केला. आजतागायत या चेकचे पुढे काय झाले, तो शेतकऱ्याला का मिळाला नाही याचे समाधानकारक उत्तर तालुका कृषी विभागाकडे नसल्याचे या घटनेने सिद्ध झाले. यावेळी व्यासपीठावर सभापती डॉ. मनोज सारंग, उपसभापती स्मिता राणे व गटविकास अधिकारी विजय चव्हाण उपस्थित होते.देवगड तालुक्यामध्ये पंचायत समिती सभापती डॉ. मनोज सारंग, उपसभापती स्मिता राणे व गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनाही औपचारिक आमंत्रण न देता व मूठभर शेतकरी व तब्बल २८ कर्मचारी घेऊन देवगडमध्ये आंबा पीक नियोजनावर कृषी मेळावा घेण्याचा देखावा करणाऱ्या तालुका कृषी विभागाला जवळजवळ सर्वच पंचायत समिती सदस्यांनी धारेवर धरले. या संदर्भात विरोधी गटनेते संतोष किंजवडेकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. तालुका कृषी अधिकारी परब यांच्या अनुपस्थितीत त्यांचे प्रतिनिधी सभागृहात केवळ तोंड दाखवून गायब झाल्यानेही सभासदांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अखेर बऱ्याच वेळानंतर हे प्रतिनिधी उपस्थित झाले व झाल्या प्रकाराबद्दल त्यांनी सभागृहाची माफी मागितली. अखेर हा मेळावा परत घेण्याचा प्रस्ताव कृषी विभागाने मान्य केल्यावरच सभासद शांत झाले. यावेळेच्या चर्चेत वसंत सरवणकर, रवींद्र जोगल, संतोष किंजवडेकर यानी प्रामुख्याने भाग घेतला.देवगड पंचायत समिती कार्यक्षेत्रातील खाडीपलिकडच्या भागाला सापत्न वागणूक मिळत असल्याबद्दल वसंत सरवणकर व दीप्ती घाडी यांनी तीव्र संताप व्यक्त केला. तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडून गेले वर्षभर विजयदुर्ग विभागाला शालेय पोषण आहार योजनेंतर्गत धान्य पुरवठा होत नसल्याबद्दल दीप्ती घाडी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली व आवाज उठवला. धान्याचे पैसे भरूनही पुरवठा होत नसेल तर विजयदुर्ग विभागासाठी वेगळ्या तालुक्याची मागणी करावी का? असा संतप्त सवाल यावेळी सरवणकर यांनी केला.जिल्हा नियोजन आराखड्यामध्ये कृषी विभागासाठी एक कोटींची तरतूद करावी अशी सूचना सदस्य प्रकाश गुरव यांनी मांडली.देवगड पंचायत समितीतर्फे किंवा जिल्हा परिषदेतर्फे वाटप करण्यात आलेल्या सौर कंदिलांची गुणवत्ता निकृष्ट आहे व ते दुरुस्त करण्यापलिकडे गेलेले असल्याचा आरोप वसंत सरवणकर यांनी केला. पंपाच्या बाबतीतही हीच परिस्थिती असून अशा निकृष्ट पंपांमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असल्याची बाब संतोष किंजवडेकर यांनी पुढे आणली. पॉवर टिलर मंजूर होऊन व शेतकऱ्यांना विकत घेऊनही त्याचे पैसे अदा करण्यास कृषी विभाग टाळाटाळ करीत असल्याचा आरोप वसंत सरवणकर यांनी केला. (प्रतिनिधी)‘सीआरझेड’ची नियंत्रणरेषा स्पष्ट करादेवगड तालुक्यातील ग्रामपंचायतींनी परवानगी दिलेली असतानाही महसूल विभाग शेतकऱ्यांच्या घरांना बेकायदेशीर ठरवून ती पाडण्याचा घाट घालत असल्याबद्दल पंचायत समिती सदस्य वसंत सरवणकर यांनी संताप व्यक्त केला. या संदर्भात खाडीकिनारी व समुद्रकिनारी कोणत्या मर्यादेपर्यंत घर बांधणी वैध आहे हे दर्शविणारी स्पष्ट रेषा नकाशावर नसल्याने हा गोंधळ होत आहे. म्हणून टाऊन प्लॅनिंगतर्फे खाडीकिनारच्या व समुद्रकिनारच्या सीआरझेड मर्यादा स्पष्ट करणारी रेषा नकाशावर स्पष्ट करण्याची मागणी एका ठरावाद्वारे करण्यात आली. हा ठराव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवून स्पष्टीकरण व्हावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे.६ गावे प्रभावितअवकाळी पावसामुळे तालुक्यात ६ गावांमधील ७.५ हेक्टर क्षेत्राखालील १२८ शेतकरी प्रभावित झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.दोन मिनिटे स्तब्धता पाळून माजी मुख्यमंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निर्मितीत महत्वाचा वाटा असलेल्या बॅ. ए. आर. अंतुले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.