शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत ‘हापूस’साठी ‘कॉमन फॅसिलिटी सेंटर’

By admin | Updated: September 11, 2016 00:24 IST

विनायक राऊत : १५.२५ कोटींच्या प्रकल्पास केंद्राची मंजुरी

रत्नागिरी : रत्नागिरी एमआयडीसीत मॅँगो प्रोसेसिंग क्लस्टरचे कॉमन फॅसिलिटी सेंटर (सीएफसी) उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कोकणातील हा पहिलाच प्रकल्प असून, यासाठी १५ कोटी २७ लाख ८ हजार रुपये खर्च येणार आहे. त्यातील ११ कोटी ६२ लाख ७२ हजार रुपये अनुदान केंद्र शासन देणार आहे. उर्वरित निधी राज्य सरकार देणार आहे. पुढील हंगामाआधी हे फॅसिलिटी सेंटर सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. रत्नागिरी व देवगड ही ठिकाणे हापूसची पंढरी म्हणून ओळखली जातात. रत्नागिरी अल्फान्सो व देवगड अल्फान्सो हे जगभरात नावाजलेले असून, जागतिक स्तरावर या उत्पादनाचा दर्जा व मानके प्रमाणित करण्यासाठी या केंद्राचा उपयोग कोकणातील आंबा बागायतदारांना होणार आहे. असे केंद्र कोकणात सुरू व्हावे यासाठी आपण केंद्रीय मंत्री कलराज मिश्र यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याबाबत विचारविनिमय होऊन या केंद्राला मंजुरी देण्यात आली. तसेच ५ सप्टेंबर २०१६ चे म्हणजेच गणेशोत्सवादिवशीचे पत्र आपल्याला मिळाले आहे. त्यामुळे केंद्राने कोकणला दिलेली ही गणेशोत्सव भेट असल्याचेही राऊत म्हणाले. आंबा उत्पादकांसाठी शासनाच्या विविध योजनांचे फायदेही मिळवून दिले जाणार आहेत. केंद्र सरकार यासाठी पुरेपूर सहकार्य देणार असल्याचेही मंत्री मिश्र यांनी म्हटल्याचे राऊत यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या रत्नागिरी कार्यक्षेत्रात चार हजार चौरस फूट जागा उपलब्ध करून देण्याचा आदेश शासनाने दिला आहे. त्यानुसार एमआयडीसी ही जागा उपलब्ध करून देणार आहे. हे महामंडळ या प्रकल्पासाठी पॅरेंट बॉडी म्हणून काम करणार आहे.येत्या नवरात्रोत्सवाआधी एमआयडीसीतील जागेची वरिष्ठांसह पाहणी करणार असल्याचे राऊत म्हणाले. सध्या कोकणात हापूसवर प्रक्रिया करणारे जे खासगी प्रकल्प आहेत त्यांनीही या सेंटरच्या सुविधांचा फायदा करून घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. (प्रतिनिधी) ‘\अल्फान्सो होणार मान्यताप्राप्तकॉमन फॅसिलिटी सेंटर’मुळे कोकणातील हापूसचा दर्जा अधिक सुधारण्यास मदत होणार आहे. तसेच यामुळे अन्य राज्यांतील हापूसच्या स्पर्धेलाही तोंड द्यावे लागणार नाही. आपोआपच रत्नागिरी व देवगड अल्फान्सो मान्यताप्राप्त होणार आहे. जागतिक स्तरावर बाजारपेठही मिळवून दिली जाणार आहे.दर्जात्मक वाढीचे मार्गदर्शनया केंद्रामार्फत आंबा उत्पादकांना पिकाबाबत तांत्रिक माहिती देण्याबरोबरच दर्जामध्ये सुधारणा करणे व जागतिक दर्जाचा हापूस निर्यात करणे, बाजारपेठ मिळविणे याविषयी मार्गदर्शन केले जाईल. तीन ते चार महिनेच असणारे हापूस उत्पादन वर्षभर कसे टिकविता येईल, याबाबतही या केंद्राकडून मार्गदर्शन होणार आहे.