शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

कणकवलीत रंगसंगीत, संगीत, एकांकिका स्पर्धा

By admin | Updated: November 8, 2015 23:32 IST

कलाविष्कार : २७, २८ रोजी कणकवली कॉलेजच्या सभागृहात आयोजन

देवगड : अक्षर सिंंधु साहित्य कला मंच सिंंधुदुर्ग कणकवली आयोजित रंगसंगीत, संगीत व गद्य एकांकिका स्पर्धा २७ व २८ नोव्हेंबर रोजी कणकवली कॉलेजच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.संगीत रंगभूमीवर वेगळा परिणाम साधणारी संगीत नाटके करणारी संस्था अशी अक्षर सिंधु साहित्य कला मंचची ओळख आहे. संगीत एकांकिका या आकृतिबंधातून संगीत नाटकाला देखील चालना मिळावी या हेतूने या स्पर्धेचे आयोजन गेली सहा वर्षे मंचतर्फे करण्यात येत आहे. कणकवली कॉलेज येथे २७ व २८ नोव्हेंबरला दिवस-रात्र या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. एका संघास दोन्ही गद्य व पद्य एकांकिका सादर करता येतील. या स्पर्धेची प्रवेशिका व प्रवेश अर्ज २० नोव्हेंबरपर्यंत द्यावयाचे असून प्रवेश विनामूल्य आहे. या स्पर्धेबाबत माहिती देताना अक्षरसिंंधु साहित्य कलामंच सिंंधुदुर्गचे संस्थापक विजय चव्हाण व थिएटर अ‍ॅकॅडमीचे सागर अत्रे म्हणाले की, नाट्य व संगीत या दोन ललित कलांचा संबंध नेहमीच जवळचा असून रंगभूमीशी फार घनिष्ठ होता. आधुनिक मराठी नाटक गावातच जन्माला आले आणि ते पुढे कित्येक वर्षे बोलले कमी आणि गायले जास्त गेले. यामुळे संगीत नाटक कमालीचे लोकप्रिय झाले आहे. यामुळेच प्रेक्षक नाटक बघायला कमी व ऐकायला जास्त जाऊ लागले. पण संगीत नाटक तेवढ्या पुरते मर्यादीत राहू नये, कालबाह्य होऊ नये, स्वत:च्या बळावर संगीत नाटके वाढवावीत व सशक्त व्हावीत याच विचारातून थिएटर अ‍ॅकॅडमी पुणे व अक्षर साहित्य कलामंच सिंंधुदुर्ग काम करीत आहे. संगीत ज्याचा प्राण आहे अशा नव्या जाणिवतेची व अक्षरसिंंधु साहित्य बदलते वास्तव सांगणारे नवीन रंगभाषा शोधणारी नाटके होणे गरजेचे आहे. या दिशेने पाऊल टाकणाऱ्या ‘रंगसंगीत’ या एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी गद्य व पद्य एकांकिका स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन थिएटर अ‍ॅकॅडमी पुणेचे सागर अत्रे, अक्षरसिंंधुचे संस्थापक विजय चव्हाण, अध्यक्ष हरिभाऊ भिसे, कार्याध्यक्ष संजय राणे यांनी केले आहे. प्रवेशिकांसाठी अधिक माहिती व संपर्कासाठी अक्षर सिंंधु साहित्य कलामंच सिंधुदुर्ग कणकवली या संस्थेचे अध्यक्ष प्रा. हरी भाऊ भिसे, कार्याध्यक्ष संजय राणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)अक्षरसिंधुला प्राथमिक फेरीच्या आयोजनाचा मानकणकवली येथे होणाऱ्या प्राथमिक फेरीच्या आयोजनाचा मान अक्षरसिंंधु साहित्य कलामंच यांना मिळाला आहे. याठिकाणी होणारी फेरी २७ व २८ नोव्हेंबरला होणार आहे. स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय असे क्रमांक गद्य व पद्य विभागातून काढण्यात येणार आहेत. प्राथमिक स्पर्धेत प्रथम क्रमांक ५ हजार, द्वितीय क्रमांक ३ हजार, तृतीय क्रमांक २ हजार अशी बक्षिसे व सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.