शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: मृत डॉल्फिनला सहकाऱ्यांनी पाठीवरून नेले, 'आँखो देखी'ने पर्यटकांचे डोळे पाणावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 13:47 IST

निसर्गाच्या अथांग दर्यात केवळ लाटांचाच थरार नसतो; तर तिथे भावनांचाही एक ओलावा असतो. याचा प्रत्यय तळाशीलच्या समुद्रात आला

मालवण : निसर्गाच्या अथांग दर्यात केवळ लाटांचाच थरार नसतो; तर तिथे भावनांचाही एक ओलावा असतो. याचा प्रत्यय मंगळवारी (दि. १६) तळाशीलच्या समुद्रात आला. एका मृत पावलेल्या छोट्या डॉल्फिनला वाचविण्यासाठी त्याच्या सहकाऱ्यांनी केलेली धडपड आणि एका मोठ्या डॉल्फिनने त्याला आपल्या पाठीवर घेत दिलेला अखेरचा आधार पाहून पर्यटकांचे डोळे पाणावले.तळाशील येथील समुद्रात मंगळवारी एक छोटा डॉल्फिन मृतावस्थेत तरंगताना आढळला. सहसा अशा वेळी कळपातील इतर जीव पुढे निघून जातात; पण येथे चित्र वेगळे होते. आपल्या छोट्या सोबत्याचा मृत्यू झाला आहे हे कळताच इतर डॉल्फिननी त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. त्या मृत पिलाला पाण्यात उलट-सुलट करून त्याला पुन्हा शुद्धीवर आणण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू होता.जेव्हा सर्व प्रयत्न थकले, तेव्हा एका मोठ्या डॉल्फिनने त्या मृत पिल्लाला आपल्या पाठीवर घेतले आणि तो त्याला लाटांमधून पुढे नेऊ लागला. हे दृश्य एखाद्या मानवी अंत्ययात्रेसारखेच भावुक होते. तळाशील ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष संजय केळुसकर यांच्या होडीतून प्रवास करणाऱ्या पर्यटकांनी हा दुर्मीळ आणि हृदयस्पर्शी प्रसंग आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.निसर्गातील हे नाते, प्रेम पाहून डोळे पाणावलेप्राण्यांनाही भावना असतात आणि तेही आपल्या आप्तांच्या मृत्यूने व्याकुळ होतात, हे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले. डॉल्फिनची ही धडपड पाहून होडीतील पर्यटकही काही काळ स्तब्ध झाले होते. निसर्गातील हे नाते आणि प्रेम पाहून प्रत्येकजण गहिवरून गेला होता. डॉल्फिनमधील ही संवेदनशीलता आपण प्रथमच इतक्या जवळून पाहिली, असे प्रत्यक्षदर्शी पर्यटकांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Grief-stricken dolphins carry dead calf, move tourists to tears.

Web Summary : In Sindhudurg, dolphins were seen struggling to revive a dead calf. A larger dolphin then carried the calf on its back through the waves. Tourists witnessed the heartbreaking scene, highlighting animal empathy and familial bonds in nature.