शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक नारळ दिन : नारळ लागवडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 16:11 IST

कल्पवृक्ष असलेल्या नारळ लागवडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधिक वाव आहे. जिल्ह्यात आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी केरळप्रमाणे नारळ लागवड केली पाहिजे. त्यामुळे दरडोई उत्पन्न वाढीस नारळ लागवड तारणहार ठरणार आहे, असे प्रतिपादन एम. के. गावडे यांनी केले.

ठळक मुद्देएम. के. गावडे यांनी केले आवाहन महिला काथ्या कामगार संस्थेत कामगार दिन साजरा

वेंगुर्ला : कल्पवृक्ष असलेल्या नारळ लागवडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधिक वाव आहे. जिल्ह्यात आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी केरळप्रमाणे नारळ लागवड केली पाहिजे. त्यामुळे दरडोई उत्पन्न वाढीस नारळ लागवड तारणहार ठरणार आहे, असे प्रतिपादन एम. के. गावडे यांनी केले.वेंगुर्ला येथील महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेत दरवर्षीप्रमाणे जागतिक नारळ दिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे सल्लागार एम. के. गावडे यांनी मार्गदर्शन केले. या जागतिक नारळ दिन कार्यक्रमाचे उद्घाटन वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष के. जी. गावडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.यावेळी संस्थेच्या सचिव प्रज्ञा परब, नारळ मित्र नारायण भिकाजी उर्फ रमण खानोलकर, सुजाता देसाई, स्वप्नील परब, नीतेश मयेकर, नंदगडकर, प्रदीप सावंत आदी उपस्थित हाते.संस्थेतर्फे दरवर्षी २ सप्टेंबरला नारळ दिन साजरा केला जातो. यावेळी निवडक शेतकरी व नारळ मित्र यांचा सत्कार करण्यात येतो. कोकणच्या आर्थिक उन्नतीसाठी व्यावसायिक दृष्टीने नारळ लागवड व्हावी यासाठी शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी हा यामागील उद्देश असल्याचे संस्थेच्या सचिव प्रज्ञा परब यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात स्पष्ट केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी तसेच एम. के. गावडे यांच्या मातोश्री सत्यवती गावडे यांच्या निधनानिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रज्ञा परब यांनी केले.काजूप्रमाणे नारळ लागवड करा : गावडेनारळ हा कल्पवृक्ष आहे. एक नारळाचे झाड एका माणसाला संपूर्ण वर्षभर पोसू शकते. नारळाचा कोणताच भाग वाया जात नाही. झावळ, सोडणे, खोड, करवंटी सर्वच भाग हे पैसा मिळवून देणारे आहेत. तरीही आपल्याकडे नारळ लागवडीकडे म्हणावे तसे लक्ष दिले जात नाही. आंबा, काजू लागवडीप्रमाणेच येथे नारळ लागवड मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन के. जी. गावडे यांनी केले. संस्था दरवर्षी जागतिक नारळ दिनाच्या निमित्ताने नारळ उत्पादक शेतकरी व नारळ मित्र यांना नारळ लागवडीसाठी प्रेरणा मिळावी, यासाठी करीत असलेले प्रयत्न कौतुस्कास्पद असल्याचे ते म्हणाले.रमण खानोलकर, स्वप्नील परब यांचा सत्कारयावेळी प्रातिनिधीक स्वरुपात नारळ उत्पादक शेतकरी तसेच नारळ मित्र रमण खानोलकर, स्वप्नील परब यांचा शाल, श्रीफळ व नारळाचे झाड देऊन सत्कार करण्यात आला.सिंधुफोटो ०१जागतिक नारळ दिन कार्यक्रमाचे उद्घाटन वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष के. जी. गावडे यांनी केले. यावेळी एम. के. गावडेही उपस्थित होते. (छाया : सावळाराम भराडकर)

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रsindhudurgसिंधुदुर्ग