शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

कोळंबा देवाच्या जत्रेला भाविकांची गर्दी उसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 17:14 IST

नांदगाववासीयांचा रक्षणकर्ता आणि नवसाला पावणारा, हाकेला धावणारा अशी ख्याती असलेल्या श्री देव कोळंबा देवाच्या जत्रेला भाविकांची मोठी गर्दी उसळली. रविवारी पार पडलेल्या या जत्रेत महाप्रसादाला तर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

ठळक मुद्देकोळंबा देवाच्या जत्रेला भाविकांची गर्दी उसळलीनांदगाववासीयांचा रक्षणकर्ता : महाप्रसादाचे भक्तांना वाटप

तळेरे : नांदगाववासीयांचा रक्षणकर्ता आणि नवसाला पावणारा, हाकेला धावणारा अशी ख्याती असलेल्या श्री देव कोळंबा देवाच्या जत्रेला भाविकांची मोठी गर्दी उसळली. रविवारी पार पडलेल्या या जत्रेत महाप्रसादाला तर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.या जत्रोत्सवानिमित्त नवस बोलणे व नवस फेडणे तसेच या जत्रेचे वेगळेपण असणारे भाकरीच्या प्रसादासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. जिल्हाभरातील तसेच राज्याच्या अनेक भागातून आलेल्या असंख्य भाविकांनी श्री देव कोळंबाचे मन भरून दर्शन घेतले.रविवारी सकाळी श्री देव कोळंबाची विधिवत पूजाअर्चा झाल्यानंतर या जत्रोत्सवास प्रारंभ झाला.

या जत्रोत्सवासाठी भाविकांचे पहाटेपासूनच आगमन होत होते. सकाळच्या सुमारास परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला. भाविकांनी सूर्योदयापासून श्री देव कोळंबाच्या दर्शनासाठी रांग लावली होती. दुपारच्या वाढत्या उन्हाबरोबरच गर्दी वाढू लागल्याने दर्शनाची रांगही लांबलचक झाली होती. रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी वाढतच होती. दरम्यान, सकाळी जत्रोत्सवास विधिवत प्रारंभ झाल्यानंतर नवस फेडण्याच्या कार्यक्रमास प्रारंभ झाला.जत्रोत्सवास येणाऱ्या भाविकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय जाणवू नये यासाठी श्री देव कोळंबा देवस्थानचे अध्यक्ष नागेश मोरये व नांदगाव ग्रामस्थांनी परिपूर्ण नियोजन केले होते. यावेळी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था, दर्शनासाठी रांगेची व्यवस्था, ठिकठिकाणी पाणपोई, आरोग्य केंद्राचे पथक, स्वयंसेवक यामुळे या उत्सवात सुरळीतपणा जाणवत होता. जत्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात आकर्षक मंडप व विद्युत रोषणाई करून मंदिर परिसर झळाळून निघाला होता.मुंबईकरांची उपस्थितीयावेळी सकाळच्या सत्रात श्री देव कोळंबा देवाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा दिसत होत्या. दुपारी उशिरापर्यंत हा कार्यक्रम सुरू होता. त्यानंतर नवीन नवस बोलण्याचा कार्यक्रम सुरू झाला. यावर्षी कोळंबा यात्रेसाठी जिल्ह्यातील भक्तांबरोबर मुंबईकर चाकरमानी मोठ्या संख्येने दर्शनासाठी आले होते. 

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेsindhudurgसिंधुदुर्ग