मालवण : निवती समुद्रातील सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या पर्ससीन पारंपरिक मच्छीमारांतील संघर्षानंतर गुन्हे दाखल करण्यात आलेल्या मालवणातील पारंपरिक मच्छिमारांना पोलिसांनी अटक केली आहे. याचा निषेध नोंदवताना मालवणातील पारंपरिक मच्छीमारांनी मासे विक्रीची हाक दिली. त्यानंतर गेले चार दिवस मालवणचे मच्छीमार्केट बंद आहे. मात्र, या साऱ्या प्रकारात छोटा मच्छीमारच पुन्हा एकदा भरडला गेला आहे. मासेमारी बंदी हंगाम सुरु असला तरी समुद्रकिनारपट्टीवर तसेच खाडीपात्रात किनारी होणाऱ्या मासेमारीतून या मच्छिमारांना मिळणाऱ्या उत्पन्नाचा वाटा हिसकावला गेला आहे. त्यामुळे मासेविक्री बंदीबाबत काही मच्छीमारांतूनच काही प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे. पर्ससीन मासेमारी वाद हा सिंधुदुर्ग किनारपट्टीवर गेली पाच सहा वर्षे तीव्र स्वरुपात उफाळून आला आहे. पर्ससीन मासेमारीमुळे पारंपरिक मच्छिमारांच्या जाळ्यात मासळीच मिळत नसल्याने काहीवेळा या वादाने उग्र रूपही धारण केले. निवती समुद्रात, तर सिंधुदुर्गातीलच निवती येथील मिनी पर्ससीन व मालवण किनारपट्टीवरील पारंपरिक मच्छिमार यांच्यात वाद भडकला. भरसमुद्रात तुफान दगडफेक झाली. त्यानंतर दोन्ही बाजूने गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी तब्बल सात महिन्यांनंतर मालवणातील गुन्हे दाखल झालेल्या मच्छीमारांना अटक झाली. या कारवाईनंतर पर्ससीन मासेमारीवर संताप व्यक्त करत मालवणातील मच्छिमारांनी मासे विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. समुद्रात मत्स्य बीज अथवा प्रजननासाठी आलेल्या माशांना या मासेमारीमुळे कोणताही धोका पोहचवला जात नाही. पर्ससीनविरोधी लढ्यात आपणही आहोत, पर्ससीन मासेमारी बंद व्हावी अथवा २२ सागरी मैलाच्या मालवणात १ जुलैपासून मासे विक्री बंदी बेमुदत कालावधीसाठी सुरु झाली असताना दुसरीकडे मालवण नगरपरिषदेने मच्छीमार्केट नुतनीकरणाचे काम निश्चित केले आहे. मत्स्य विक्रेत्यांसाठी भाजी मंडईत पर्यायी जागा देण्यात आली आहे. मत्स्य वाहतूक करताना लांब पडणारे अंतर,साठवणुकीसाठी नसलेली जागा अशी अनेक कारणे आहेत. ६ जुलै रोजी नुतनीकरण कामास सुरुवात होत आहे. याबाबतची नोटीस मच्छिमार्केट आवारात लावण्यात आली आहे.(वार्ताहर)
मासे विक्री बंद; मालवणात वाढती नाराजी
By admin | Updated: July 4, 2015 00:11 IST