शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जलतरण तलावांतील सायंकाळची बॅच बंद

By admin | Updated: October 21, 2015 22:44 IST

पाणीकपातीचा परिणाम : महापालिकेने घेतला निर्णय

नाशिक : गंगापूर धरणातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन महानगरपालिकेने दि. ९ आॅक्टोबरपासून पाणीकपात घोषित केल्यानंतर शहरातील मनपाच्या मालकीच्या पाचही जलतरण तलावांतील पाणीबचतीसाठी सायंकाळची बॅच बंद करण्यात आल्याची माहिती अधीक्षक अभियंता यू. बी. पवार यांनी दिली.पावसाने दिलेली ओढ आणि गंगापूर धरणात ७० टक्के पाणीसाठा लक्षात घेऊन भविष्यात पाणीसंकट ओढवू नये, यासाठी महानगरपालिकेने सावधानता बाळगत दि. ९ आॅक्टोबरपासून शहरात एकवेळ पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यासाठी पाणीपुरवठ्याचे विभागनिहाय वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. पाणीकपातीच्या घोषणेप्रसंगीच महापौरांनी शहरातील वॉटरपार्क, जलतरण तलाव यांचा पाणीपुरवठाही बंद करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, दि. १३ आॅक्टोबरपासून शहरातील मनपाच्या मालकीच्या पाचही जलतरण तलावांमध्ये पाणीबचतीचे धोरण अवलंबिले जात असून, केवळ सकाळची बॅच सुरू ठेवत सायंकाळची बॅच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात त्र्यंबकरोडवरील वीर सावरकर जलतरण तलावासह नाशिकरोड, सिडको, सातपूर आणि पंचवटी याठिकाणी महापालिकेचे जलतरण तलाव आहेत. पाचही जलतरण तलावमिळून सुमारे एक लाख लिटर्स पाणी लागते. याशिवाय जलतरण तलावांमध्ये शॉवर्सचीही व्यवस्था आहे. सुमारे पाच हजार सभासद असून, सकाळ-सायंकाळ बॅचेस चालतात. पाणीकपातीच्या धोरणामुळे आता केवळ सकाळची बॅच सुरू ठेवण्यात येणार असल्याचे यू. बी. पवार यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

सराव : राज्य-राष्ट्रीय खेळाडूंची मागणी

महापालिकेने पाणीकपातीमुळे सायंकाळची बॅच बंद केल्याने विविध राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या सरावावर परिणाम झाला आहे. बव्हंशी खेळाडू हे सायंकाळी ७ ते ८ या वेळेत सरावासाठी जलतरण तलावांवर येत असतात. मोजक्या संख्येने असलेल्या या खेळाडूंच्या सरावात खंड पडू नये यासाठी त्यांच्यासाठी सायंकाळी जलतरण तलाव खुले ठेवण्याची मागणी संबंधित खेळाडूंनी महापालिकेकडे केली आहे. या खेळाडूंच्या मागणीवर विचार सुरू असल्याची माहिती यू. बी. पवार यांनी दिली.