शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

क्रशर बंद करा; ग्रामस्थांचा ठिय्या

By admin | Updated: April 13, 2015 00:06 IST

कोळोशी-आयनल हद्दीतील घटना : नायब तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

नांदगाव : गेली अनेक वर्षे कोळोशी- आयनल मणेरवाडी हद्दीत सुरू असलेल्या क्रशरमुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून या त्रासामुळे अक्षरश: जीव मुठीत घेऊन येथील ग्रामस्थ जीवन जगत आहेत. यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीही संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे हा क्रशर त्वरित बंद करावा, या मागणीसाठी कोळोशी व आयनलच्या ग्रामस्थांनी क्रशर परिसरात रविवारी सकाळी ठिय्या मांडला. अखेर महसूलच्या निवडणूक नायब तहसीलदार कांता खटावकर यांच्या आश्वासनानंतर संतप्त ग्रामस्थांनी ठिय्या सोडला. मात्र, आश्वासनांची पूर्तता न झाल्यास ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असेही ग्रामस्थांनी सांगितले.२००१ पासून कोळोशी व आयनल सीमेवर हा क्रशर सुरू झाला. त्यावेळी हा क्रशर याठिकाणी होऊ नये यासाठी ग्रामस्थांनी विरोधही केला होता. अनेक लोकप्रतिनिधींशी पत्रव्यवहार करून त्यातील भिषणता व भविष्यातील समस्या लक्षात आणून दिल्या. मात्र, क्रशरला मान्यता मिळून सुरूवातही झाली. या क्रशर परिसरात आयनल- कोळोशीमधील सुमारे ४० कुटुंबे येत असून यातून निर्माण होणाऱ्या धुळीचा परिणाम, गुरे, फळझाडे यांच्यासह ग्रामस्थांनाही जाणवतो. यामुळे सुमारे एक ते दीड किलोमीटर परिसरात धुळीचा थर पसरत असून या क्रशरमध्ये लावण्यात येणाऱ्या सुरूंगाचाही दुष्परिणाम या ग्रामस्थांना जाणवतो. अचानक केव्हाही लावण्यात येणाऱ्या सुरूंगाच्या स्फोटामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे हा क्रशर त्वरित बंद करावा, अशी जोरदार मागणी केली.शनिवारी सायंकाळी क्रशर परिसरात सुरूंग लावण्यात आले. या सुरूंगामुळे परिसरातील फळबागेत काम करणारे कामगार व ग्रामस्थांत घबराट पसरली. शेजारच्या घरातील भांडी पडणे, भिंतींना जबरदस्त हादरा बसणे असे प्रकार घडले. हा भीतीदायक स्फोट दगड फोडण्यासाठी करण्यात आला. शनिवारी या स्फोटाची पूर्वकल्पना कोणालाही देण्यात आलेली नव्हती. गेली अनेक वर्षे असा नियमित त्रास सहन करावा लागत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी रविवारी सकाळी क्रशरच्या ठिकाणी येत क्रशर त्वरित बंद करावा, अशी मागणी करीत ठिय्या मांडला. तसेच जोपर्यंत शासकीय अधिकारी येत नाहीत तोपर्यंत जागा सोडणार नाही, यावर ग्रामस्थ ठाम राहिले.दरम्यान, जिल्हा परिषद सदस्या विभावरी खोत यांनी तहसीलदारांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली असता महसूलचे अधिकारी पाठवितो, असे सांगण्यात आले. त्यानंतर निवडणूक नायब तहसीलदार कांता खटावकर घटनास्थळी आले. ग्रामस्थ व क्रशर मालक यांचे म्हणणे ऐकून घेऊन परिसरातील घरे, बागा व क्रशर यांची पाहणी केली. त्यानंतर काढलेली खडी, आतापर्यंत केलेले खोदकाम यांची पाहणी करून वस्तुस्थितीदर्शक पंचनामा केला. यावेळी नांदगावचे तलाठी वसंत कोतमिरे व महसूलचे लिपिक यु. जी. दळवी उपस्थित होते.खटावकर यांनी सोमवारी क्रशर सील करण्यासाठी कार्यवाही केली जाईल, असे सांगितल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. यावेळी कोळोशी व आयनल ग्रामस्थांनी नायब तहसीलदार खटावकर यांच्याकडे लोकांच्या जीविताचा प्रश्न असून भविष्यात उद्भवणारे गंभीर परिणाम लक्षात घेता या क्रशरबाबत ठोस कार्यवाही करावी, याबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी निवडणूक नायब तहसीलदार कांता खटावकर, नांदगाव तलाठी वसंत कोतमिरे, यु. जी. दळवी, आयनल सरपंच हेमलता ओटवकर, ओटव सरपंच श्वेता ओटवकर, कोळोशी सरपंच सुशील इंदप, जिल्हा परिषद सदस्या विभावरी खोत, आयनल पोलीस पाटील दिलीप साटम, उपसरपंच दशरथ वायंगणकर, संघर्ष समिती सचिव भालचंद्र चव्हाण, सहसचिव उत्तम सावंत व कोळोशी- आयनलचे ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)..तर ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेलयावेळी नायब तहसीलदार कांता खटावकर यांनी दिलेले आश्वासनाचे पालन न झाल्यास ग्रामस्थ आक्रमक होतील व त्यामुळे ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी चर्चा ग्रामस्थांमधून होत होती. या क्रशरबाबत यावेळी ग्रामस्थांनी मात्र आक्रमकच पवित्रा घेतल्याचे आजचे चित्र दिसत होते.गेली १५ वर्षे हा क्रशर सुरू असून या क्रशरबाबत ग्रामस्थांच्या असलेल्या तक्रारी लक्षात घेऊन या परवान्याला नूतनीकरण देण्यात येऊ नये, अशी मागणी संघर्ष समितीने यापूर्वीच केली आहे. मात्र, नूतनीकरणाला परवानगी न देताना अनधिकृतपणे सुरू असलेल्या या क्रशरवर कार्यवाहीही तेवढ्याच डोळसपणे करावी, अशी मागणी करण्यात आली.या क्रशरबाबत शासनासह प्रशासनाला जाग यावी यासाठी २०१२ साली संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. या संघर्ष समितीने शासनातील विविध लोकप्रतिनिधी व प्रशासनातील विविध अधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे याचे गांभीर्य लक्षात आणून दिले. मात्र, संघर्ष समितीच्या या निवेदनाकडे कोणीच लक्ष दिले नाही. संघर्ष समितीचा गेली तीन वर्षे असाच संघर्ष सुरू होता. त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक होत आता ठिय्या करण्याचा पवित्रा घेतला.