शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

त्रिसदस्यीय गाव बनतंय १७ ‘सेवकां’चे नगर

By admin | Updated: October 14, 2015 00:02 IST

११ सरपंच आणि २ प्रशासक : पन्नाशीत झाली नगरपंचायत, ४0 वर्षे काँग्रेसचा कारभार

सुपर व्होट १--वाभवे-वैभववाडी -गावाकडून नगराकडेकालपरवापर्यंत कोल्हापूरी ‘टच’ असलेल्या वाभवे-वैभववाडी गावाचे नगरात रुपांतर होवू घातले आहे. या शहराने अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. तालुक्याच्या मुख्यालयाचे शहर असूनही या शहराच्या विकासाला दिशा देणारे सक्षम स्थानिक नेतृत्व उभे राहू न शकल्याने विकासाचा ‘बॅकलॉग’ मोठा आहे. ग्रामपंचायतीतून नगरपंचायतीत जाताना नागरिकांच्या अपेक्षांचे ओझे नव्या सेवकांवर असणार आहे. त्यामुळे नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने शहराच्या वाटचालीचा आढावा घेण्याचा प्रयत्न...प्रकाश काळे ल्ल वैभववाडीगगनबावडा तालुक्यातील ३00 लोकवस्तीच्या वाभवे गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करण्यासाठी तत्कालीन नेतृत्वाच्या प्रयत्नांना १९६५ मध्ये यश लाभले. त्यामुळे वाभवे-एडगाव-वायंबोशी या ग्रुप ग्रामपंचायतीचे खासबाब म्हणून विभाजन होऊन स्वतंत्र वाभवे-वैभववाडी ग्रामपंचायत अस्तित्वात आली. गेल्या पन्नास वर्षात ११ सरपंच आणि २ प्रशासकांनी वाभवे-वैभववाडी ग्रामपंचायतीचा कारभार केला. त्यातील शिवसेना व राष्ट्रवादीचा दहा वर्षांचा कालखंड वगळता उर्वरित ४0 वर्षे काँग्रेसने कारभार केला. विभाजनापूर्वी वाभवे-एडगाव-वायंबोशी ग्रुप ग्रामपंचायतीत ३ सदस्य असणाऱ्या गावाचे आता नगरपंचायतीमुळे १७ सेवकांचे नगर बनणार आहे.वाभवे-एडगाव-वायंबोशी ग्रुप ग्रामपंचायतीतून विभक्त होऊन वाभवे-वैभववाडीची स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करण्याची मागणी १९६२ च्या सुमारास जोर धरत होती. त्यावेळी या गावाची लोकसंख्या जेमतेम ३00 च्या घरात होती. त्यामुळे लोकसंख्येचा निकष ग्रामपंचायत निर्मितीतील मोठा अडसर होता. त्यावेळी स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी शासनाची ६00 लोकसंख्येची अट होती. मात्र, तत्कालीन स्थानिक नेतृत्वाची सचिवालयाशी असलेली जवळीक काहीशी कामी आली. त्यामुळे नांदेडमधील एका नवनिर्मित छोट्या ग्रामपंचायतीच्या संदर्भाने वाभवे-वैभववाडी ही १९६५ मध्ये राज्यातील सर्वात कमी लोकसंख्येची नवीन ग्रामपंचायत अस्तित्वात आली.वाभवे-वैभववाडी ग्रामपंचायत झाली तेव्हा आताच्या वैभववाडी शहरात लोकवस्ती अगदीच विरळ होती. एका घरात स्वतंत्र ग्रामपंचायतीचे कार्यालय सुरू करण्यात आले होते. वाभवे-वैभववाडीचे पहिले सरपंच म्हणून कै. रावजी गंगाराम रावराणे यांना बहुमान मिळाला. तत्पूर्वी वाभवे-एडगाव-वायंबोशी ग्रुप ग्रामपंचायतीचेही सरपंच तेच होते. त्यावेळी ९ सदस्य असणाऱ्या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये वाभवे गावातून फक्त तीन सदस्य निवडून जात होते. कै. रावजी रावराणे यांचा वाभवे गावावर चांगला प्रभाव होता. त्यामुळे १९६५ ते १९७८ या तेरा वर्षाच्या कालावधीत सरपंच म्हणून त्यांनी यशस्वी कारभार केला.त्यानंतर जून १९७८ ते जानेवारी १९८0 या काळात सिंधु कदम, जानेवारी १९८0 ते १९८४ गंगाराम रावराणे, १९८४ ते १९८९ वसंत कदम, यांनी सरपंच म्हणून कारभार केला. तो काळ ग्रामपंचायतींच्या अधिकार कक्षा वाढविणारा होता. त्यानंतरच्या पंचवार्षिक निवडणुकीत कै. केशवराव रावराणे यांच्याकडे ग्रामपंचायतीची सूत्रे गेली. त्यांनी १९८९ ते १९९५ या काळात आपल्या परीने ग्रामविकासाला चालना देत केशवराव रावराणेंनी वैभववाडी बाजारपेठच्या विस्तारीकरणावर भर दिला. त्यामुळे गावातील छोट्या पायवाटांचे चांगल्या रस्त्यांमध्ये रुपांतर झाले.एक वर्ष प्रशासक म्हणूनही केशवरावांनी कारभार पाहिला. त्यानंतर मात्र, बाजारपेठच्या विस्तारीकरणाबरोबरच गावातील पायाभूत सुविधांच्या समस्या वाढत गेल्या. त्या आजमितीस कायम आहेत. १९९५ ते २000 या पाच वर्षात सदानंद माईणकर व २000 ते २00४ सुप्रिया मांजरेकर यांनी सरपंचपद भूषविले. त्यानंतर एक वर्ष वाभवे ग्रामपंचायतीवर प्रशासक होता. २00५ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर २0१0 पर्यंत रमेश चव्हाण व २0१0 ते एप्रिल २0१५ पर्यंत कै. केशवराव यांच्या स्नुषा जयश्री पुरुषोत्तम रावराणे यांनी सरपंच पदाची धुरा सांभाळली. यापैकी शिवसेनेचे सदानंद माईणकर व राष्ट्रवादीचे रमेश चव्हाण यांची पाच-पाच वर्षे वगळता उर्वरित तब्बल ४0वर्षे काँग्रेसने कारभार केला आहे.जुना डाव : पहिल्यापासून खेळावा लागणारगेल्या पन्नास वर्षांच्या काळात कोल्हापूर आणि सिंधुदुर्गच्या राजकारणातील अनेक स्थित्यंतरे वाभवे-वैभववाडी गावाने जवळून पाहिली आहेत. पन्नास वर्षापूर्वीचे ३ सदस्यांचे गाव आता १७ सेवकांचे नगर बनणार आहे. त्यामुळे नगरपंचायत निवडणुकीनंतर नगरविकासाचा श्रीगणेशा करून शहराचे वैभव वाढविण्यासाठी जुना डाव पहिल्यापासून पुन्हा खेळावा लागणार आहे.