शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

जिल्हा बँक अध्यक्षपदी चोरगेच

By admin | Updated: May 22, 2015 00:08 IST

उपाध्यक्षपदी बाबाजी जाधव : अपेक्षेप्रमाणे निवडणूक बिनविरोध

रत्नागिरी : जिल्हा बॅँक निवडणुकीत सहकार पॅनेलने पुन्हा सत्ता संपादन केल्यानंतर बॅँकेच्या अध्यक्षपदी डॉ. तानाजी चोरगे, तर उपाध्यक्षपदी बाबाजी जाधव यांची गुरुवारी बिनविरोध फेरनिवड झाली. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रसाद उकर्डे यांच्या उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया झाली.जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी, कॉँग्रेस व भाजप उमेदवारांचा समावेश असलेल्या सहकार पॅनेलने पुन्हा एकदा बाजी मारली. २१ पैकी १६ जागा जिंकल्यानंतर पुन्हा एकदा डॉ. चोरगे हे अध्यक्ष होणार, हे स्पष्ट झाले होते. त्यानुसार गुरुवारी ही निवडणूक बिनविरोध होऊन चोरगे यांच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झाले आहे.अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीसाठी नवनिर्वाचित संचालकांची गुरुवारी सकाळी ११ वाजता बॅँकेच्या सभागृहात बैठक बोलावण्यात आली होती. सभेच्या सुरुवातीला डॉ. चोरगे यांनी अध्यक्षपदासाठी, तर बाबाजी जाधव यांनी उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. मधुकर टिळेकर व संजय रेडीज यांनी दोघांनाही अनुक्रमे सूचक म्हणून स्वाक्षऱ्या केल्या. शिवसंकल्प पॅनेलच्या संचालकांपैकी कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी उकर्डे यांनी डॉ. चोरगे व जाधव यांची निवड बिनविरोध झाल्याचे घोषित केले.यावेळी संचालक शेखर निकम, राजेंद्र सुर्वे, अ‍ॅड. दीपक पटवर्धन, संजय रेडीज, दिनकर मोहिते, रमेश दळवी, मनोहर सप्रे, अनिल जोशी, सुधीर कालेकर, किरण सामंत, आदेश आंबोळकर, मधुकर टिळेकर, जयवंत जालगावकर, अमजद बोरकर, चंद्रकांत बाईत, नेहा माने, माधुरी गोखले व अन्य संचालक उपस्थित होते. (प्रतिनिधी)नाट्य घडलेच नाही...बॅँकेच्या उपाध्यक्षपदावरून काही नाट्य घडेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, डॉ. चोरगे यांनी संचालकांना चांगल्याप्रकारे हाताळल्याने अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली. तरीही उपाध्यक्षपद काही संचालकांना एका वर्षासाठी दिले जाणार की, या पदाचा अडीच वर्षांचा कालावधी राहणार, याबाबतची चर्चा सुरू होती.