शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : चिरेखाणीवरील कामगारांच्या पेटल्या चुली, शिवाजी कोळी यांनी घेतला पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 16:34 IST

आम्ही चिरेखाणीवर रोजंदारीवर काम करतो.. धान्यसाठा संपला आहे...झोपडीत आता अन्नाचा कणसुद्धा नाही... एकतर आम्हांला धान्य द्या, नाहीतर गावी जाण्याची परवानगी द्याह्ण अशी कैफियत असरोंडी येथील एका चिरेखाणीवर काम करणाऱ्या दहा कामगारांनी कणकवली पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्याकडे मांडली.

ठळक मुद्देचिरेखाणीवरील कामगारांच्या पेटल्या चुली, शिवाजी कोळी यांनी घेतला पुढाकार उपाशी कामगारांना संदीप मेस्त्री मित्रमंडळाने दिले अन्नधान्य

कणकवली : आम्ही चिरेखाणीवर रोजंदारीवर काम करतो.. धान्यसाठा संपला आहे...झोपडीत आता अन्नाचा कणसुद्धा नाही... एकतर आम्हांला धान्य द्या, नाहीतर गावी जाण्याची परवानगी द्याह्ण अशी कैफियत असरोंडी येथील एका चिरेखाणीवर काम करणाऱ्या दहा कामगारांनी कणकवली पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्याकडे मांडली.

ही गोष्ट कणकवली कलमठ येथील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना कळली. त्यांनी संदीप मेस्त्री मित्रमंडळाच्यावतीने १५ दिवसांसाठी लागणारा किराणा माल, धान्य, भाज्या उपलब्ध करून दिल्या. पोलीस ठाण्यातच निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या उपस्थितीत अन्नधान्याचे वाटप त्या कामगारांना केले. त्यामुळे चिरेखाणीवरील कामगारांच्या चुली पुन्हा पेटल्या आहेत.कणकवली तसेच मालवण तालुक्याच्या सीमेवरील असरोंडी गावातील चिरेखाण काम करणारे १० कामगार किराणा माल नसल्याने कणकवली पोलीस स्थानकांत गावी जाण्यासाठी परवानगी मागण्यासाठी आले होते. संचारबंदी असल्याने आहे त्या जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास बंदी आहे. मात्र, चिरेखाणीच्या ठिकाणी रहायचे असेल तर या कामगारांकडे अन्न नव्हते. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यातून मार्ग काढण्यासाठी त्या कामगारांनी कणकवली पोलीस ठाणे गाठले.

कणकवली पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या उपस्थितीत त्या दहा गरजूंना मदत वितरित करण्यात आली. यावेळी संदीप मेस्त्री, पोलीस पाटील संतोष जाधव, नितीन पवार, विठ्ठल चव्हाण, अभी साटविलकर, समीर कवठणकर, केतन दळवी आदी उपस्थित होते.माणुसकीचे दर्शनपोलीस ठाण्यात झालेली गर्दी पाहून काही कार्यकर्ते तेथे गेले असता त्यांना कामगारांची समस्या लक्षात आली. या गरजूंना मदतीचा हात देत संदीप मेस्त्री मित्रमंडळाने पंधरा दिवस पुरेल इतके धान्य उपलब्ध करून दिले व माणुसकीचे दर्शन घडविले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग