शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचे सिंधुदुर्गवर विशेष लक्ष : दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 12:30 IST

Shivsena, DeepakKesrkar, Sawantwadi, Sindhudurngnews शिवसेनेचे हात अधिक मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून झालेली विकासकामे लोकांच्या निदर्शनास आणून द्या, असे आवाहन माजी राज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी केले. ते रविवारी कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात सभासद नोंदणी कार्यक्रमात बोलत होते.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचे सिंधुदुर्गवर विशेष लक्ष : दीपक केसरकर जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून शिवसेनेला बळकट करा

सावंतवाडी : भाताला दर सर्वाधिक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला आहे. हे शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आपल्या जिल्ह्यावर असलेल्या प्रेमामुळेच. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून त्यासाठी ९६६ कोटी रुपये मंजूर केले.

शिवसेनेचे हात अधिक मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून झालेली विकासकामे लोकांच्या निदर्शनास आणून द्या, असे आवाहन माजी राज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी केले. ते रविवारी कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात सभासद नोंदणी कार्यक्रमात बोलत होते.यावेळी पक्ष निरीक्षक सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, चंद्रकांत कासार, महिला तालुका संघटक अपर्णा कोठावळे, उपतालुकाप्रमुख बाळू माळकर, महिला उपतालुका संघटक चित्रा धुरी, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा, पंचायत समिती सदस्य मेघश्याम काजरेकर, विभागप्रमुख नामदेव नाईक, उपविभागप्रमुख भरत सावंत, बाळू गवस, कोलगाव सरपंच शिवदत्त घोगळे, आंबेगाव सरपंच वर्षा वरक, कोलगाव शाखाप्रमुख सुधाकर चव्हाण, दीपक नाईक, भाई सावंत, बाळू कारिवडेकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते.आमदार केसरकर म्हणाले, भाताला दर सर्वाधिक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला आहे हे आपल्या पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आपल्या जिल्ह्यावर असलेल्या प्रेमामुळेच. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून त्यासाठी ९६६ कोटी रुपये मंजूर केले आहेत.

शिवसेनेचे हात अधिक मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी झालेली विकासकामे लोकांच्या निदर्शनास आणून जास्तीत जास्त सभासद नोंदणी करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तर जिल्हाप्रमुख संजय पडते व महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत यांनी संघटनात्मक पद्धतीने कशा पद्धतीने काम करून जास्तीत जास्त सभासद नोंदणी होऊ शकते याचे मार्गदर्शन केले.दडपशाही करणाऱ्यांना हद्दपार करू : सतीश सावंतसतीश सावंत म्हणाले, आपण नेहमीच चांगल्या गोष्टीला साथ देतो. शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे हे कोणाच्या दडपणाखाली चुकीच्या पद्धतीने वापरले जाऊन बँकेचे नुकसान होऊ नये यासाठीच शिवसेनेत आलो. याठिकाणी लोकांच्या हिताचे निर्णय घेतले जातात. कुठलेही दडपण नाही. त्यामुळे अधिक जोमाने काम करण्याचा आनंद मिळतो.सभासद नोंदणीच्या निमित्ताने आपल्याला लोकांच्या गाठीभेटी घेण्याची संधी चालून आली आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन सभासद नोंदणी करून सदस्य बनवा. ती आपली पक्षाची ताकद असेल व भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत आपण विजय संपादन करून दडपशाही करून अन्याय करणाऱ्यांना जिल्ह्यातून हद्दपार करू, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSawantwadiसावंतवाडीsindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर