शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

खासदारांच्या नावाने फसवणूक

By admin | Updated: January 28, 2017 22:48 IST

खोटी निविदा बनवली : म्होरक्या संतोष नारायणकरला राजस्थानात अटक

रत्नागिरी : खेड तालुक्यातील साखरोळी गावातील १० कामांसाठी सुमारे १ कोटी ७० लाखांची निविदा तयार करून त्यावर खासदार अजय संचेती यांची खोटी सही करून ती निविदा जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करुन शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार १५ मार्च २०१६ रोजी उघड झाला होता. या प्रकरणातील म्होरक्या संतोष दगडू नारायणकर याला रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने राजस्थान येथे जेरबंद केले़ शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, ३ फेब्रुवारीपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़शांताराम गणपत देशमुख (रा. गोडावून स्टॉप, रत्नागिरी) हे जिल्हाधिकारी कार्यालयात संशोधन सहाय्यक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत़ १५ मार्च रोजी संतोष नारायणकर याने जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे खासदार अजय संचेती यांच्या नावाचा आपल्या स्वार्थासाठी वापर केला़ त्यांच्या नावे खोटा दस्तऐवज तयार करून खासदार संचेती यांचे खोटे लेटरहेड तयार केले व त्याद्वारे खेड तालुक्यातील साखरोळी गावातील १० कामांची सुमारे १ कोटी ७० लाख रुपयांची निविदा तयार करून त्यावर खासदारांची खोटी सही केली़ हा खोटा दस्तऐवज शासकीय कामात वापरण्याचा प्रयत्न त्याने केला. परंतु, जिल्हाधिकारी कार्यालयातील चाणाक्ष कर्मचाऱ्यांमुळे हा प्रकार उघडकीस आला होता़ परंतु, तेव्हापासून संतोष नारायणकर हा फरार झाला होता़रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा पथकाला संतोष हा राजस्थान येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती़ त्यामुळे पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तुषार पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री गायकवाड व पोलीस निरीक्षक काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक राजस्थान येथे सहा दिवसांपूर्वी रवाना करण्यात आले होते़ गेले सहा दिवस सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन ढेरे व त्यांचे पथक संतोष नारायणकर याच्या मागावर होते़ शुक्रवारी गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने संतोष याला सापळा रचून राजस्थान येथे शिताफीने अटक केली.ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, पोलीस नाईक प्रवीण खांबे, पोलीस कॉन्टेबल भैरवनाथ सवाईराम, राहुल घोरपडे, पोलीस नाईक उमेश गायकवाड, दीपक जाधव, पोलीस शिपाई महेश पाटील यांनी केली तर यासाठी तांत्रिक मदत रमिज शेख यांनी केली़ (वार्ताहर)मुंबईतही फसवणुकीचा प्रयत्नसंतोष नारायणकर याने रत्नागिरीसह मुंबई येथेही अशाच प्रकारची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला होता़ त्यामुळे मुंबईतही त्याच्याविरोधात गुन्हा दाखल असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे़ त्याच्या अटकेनंतर अजून काही गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे़ नारायणकर याची सध्या कसून चौकशी सुरु असून, त्यातून अनेक बाबी पुढे येण्याची शक्यता आहे.