शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

युतीसाठी केसरकरांचे चव्हाण यांना साकडे

By admin | Updated: January 5, 2017 23:50 IST

आरोसबाग पुलाचे भूमिपूजन : चूक टाळण्याचे आवाहन

बांदा : शिवसेना-भाजप हे नगरपालिका निवडणुकीत एकत्र न आल्याचा फटका हा आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही बसू नये, यासाठी युती होणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर दोन्ही पक्ष प्रयत्नशील आहेत. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आपण इथले भाजपचे ‘इनचार्ज’ आहात, त्यामुळे आपण आपल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना युती करण्यासाठी राजी करा, असे साकडे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृह व वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी घातले. येथील तेरेखोल नदीपात्रावरील बांदा-आरोसबाग पुलाच्या कार्यारंभप्रसंगी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रदेश सरचिटणीस राजन तेली, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कामत, पंचायत समिती सदस्या श्वेता कोरगावकर, स्वप्निल नाईक, माजी जिल्हाध्यक्ष विजयकुमार मराठे, श्यामकांत काणेकर, शेर्ले सरपंच उदय धुरी, अशोक दळवी, बांदा सरपंच मंदार कल्याणकर, सावंतवाडीचे नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, बाळा आकेरकर, शीतल राऊळ, राजू राऊळ, आदी उपस्थित होते. यावेळी राज्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते कलशपूजन करण्यात आले. त्यानंतर मंत्री रवींद्र चव्हाण व मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते तेरेखोल नदीपात्रात जलपूजन करण्यात आले.यावेळी मंत्री केसरकर म्हणाले की, आरोसबाग पुलाचा प्रश्न हा जनतेच्या जिव्हाळ्याचा आहे. आघाडी शासनाच्या कार्यकाळात रखडलेला हा पूल पुन्हा युती शासनाच्या कार्यकाळात पूर्णत्वास येत आहे. नाबार्डमधून या पुलासाठी खास निधीची तरतूद करण्यात आली आहे. यावेळी अतुल काळसेकर, संजय चांदेकर यांनी विचार मांडले. कार्यकारी अभियंता बच्चे पाटील यांनी पुलाचा आराखडा सांगितला. तसेच जून २0१८ पर्यंत पुलाचे बांधकाम पूर्ण होणार असल्याचे सांगितले. मंदार कल्याणकर, शीतल राउळ, सनी काणेकर यांनी स्वागत, तर रूपाली शिरसाट यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)काळसेकरांची समजूत घाला : केसरकरदीपक केसरकर यांनी भाषण करताना आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत युती होण्याबाबत त्यांनी रवींद्र चव्हाण यांना अतुल काळसेकरांची समजूत घालण्यासाठी भर व्यासपीठावरच साकडे घातले. बांदा जिल्हा परिषद व दोन्ही पंचायत समित्यांवर काळसेकर हे भाजपचा दावा करीत असल्याने आपण त्यांची जरा समजूत घालावी, अशी कोपरखळी त्यांनी काळसेकरांना लगावली. अतुल काळसेकर हे सर्वच जागांवर दावा करीत असल्याने आम्ही जगायचे कसे, असा सवाल त्यांनी करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.