शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

प्रभारी उपअभियंता जाळ्यात

By admin | Updated: February 6, 2015 00:38 IST

‘लाचलुचपत’ची कारवाई : नळपाणी योजनेच्या मंजुरीसाठी दहा हजारांची लाच

राजापूर : तालुक्यात उग्र पाणीटंचाईचे संकट आ वासून उभे असताना याकडे साफ दुर्लक्ष करत ठेकेदाराने काम केलेल्या नळपाणी योजनेचे बिल मंजूर करण्यासाठी दहा हजारांची लाच घेतल्याप्रकरणी राजापूर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी उपअभियंता रामकृष्ण लक्ष्मण लठाड याला रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली; तर अन्य एका खासगी ठेकेदाराला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.राजापूर तालुक्यात एका नळपाणी योजनेचे काम सुरू असून, झालेल्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी राजापूर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी उपअभियंता रामकृष्ण लठाड याने ठेकेदाराकडून पाच टक्केप्रमाणे दहा हजारांची मागणी केली होती. लठाडने ‘ही रक्कम आणून दे व तुझे बिल घेऊन जा’, असा तगादा लावला होता. त्यानंतर संबंधित ठेकेदाराने याबाबतची तक्रार रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची खातरजमा केली.गेले दोन दिवस ‘लाचलुचपत’चे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सापळा रचला होता. मात्र, लठाड हा कार्यालयात नव्हता. त्यामुळे कार्यवाहीला वेळ लागत होता. गुरुवारी (दि. ५) तो आपल्या कार्यालयात दाखल झाल्यानंतर दुपारी ३.३० च्या दरम्यान संबंधित ठेकेदार दहा हजारांची रक्कम घेऊन त्याच्याकडे गेला व ती रक्कम लठाड याला दिली. मात्र, चौकशी सुरू असताना अशी कोणत्या प्रकारची रक्कम रामकृष्ण लठाडकडे आढळून आली नाही. अनेक वर्ष कारभार‘लाचलुचपत’ विभागाने पकडलेला रामकृष्ण लक्ष्मण लठाड हा गेली अनेक वर्षे राजापूर ग्रामीण पाणीपुरवठा विभागात शाखा अभियंता म्हणून कार्यरत असून, मागील काही महिन्यांपासून त्याच्याकडे उपअभियंता पदाचा कार्यभार होता.