शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
4
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
5
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
6
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
7
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
8
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
9
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
10
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
11
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
12
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
13
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
14
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
15
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
16
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
17
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
18
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
19
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
20
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 

जिल्ह्यात दरवळणार चंदनाचा सुगंध

By admin | Updated: June 6, 2016 00:50 IST

सामाजिक पर्यावरण मंडळ : चिपळुणात १२ रोजी कार्यशाळा

चिपळूण : कोकणातील पहिल्या जंगलपेर अभियान चळवळीच्या यशस्वी आयोजनानंतर निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळ, महाराष्ट्रतर्फे रविवार, १२ जून रोजी सकाळी १०.३० वाजता पेढे येथील श्री परशुराम सानिध्य निसर्ग पर्यटन केंद्र येथे वैशिष्ट्यपूर्ण चंदन लागवड कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. चंदन हा सदाहरित वृक्ष असून, त्याच्या फांद्या सडपातळ, सरळ अथवा वाकड्या असतात. याची उंची साधारणपणे १२ ते १५ मीटर असून, घेर २ ते २.५ मीटरपर्यंत असतो. याची पाने सदाहरित, अंडाकार, टोकदार, समोरासमोर व देठाकडे निमुळती असतात. खोड लहान व कमी जाडीचे असते, तेव्हा मऊ असते. परंतु, जसजसे झाड मोठे होते, तसे त्याची साल खरबरीत व उभ्या चिरा असलेली बनत जाते. याचे लाकूड कठीण, सूक्ष्म दाणेदार कणांनी बनलेले तेलयुक्त असते. लाकडाचा बाहेरील भाग सफेद व सुगंधहीन असतो, तर आतील गाभा पिवळसर व तपकिरी असून, तो अतिशय सुगंधी असतो. चंदनाला जगभरात खूप मागणी असते. चंदनाचा भाव प्रतिकिलो ४ हजार ते ४५०० रुपये इतका आहे. २० वर्षे वाढलेल्या चंदनापासून २८ किलो लाकूड मिळते. एका हेक्टरमधून वीस वर्षांनंतर ६०० रोपांपासून ६ कोटी रुपयापर्यंत उत्पन्न मिळू शकते. चंदन तेलालाही राज्यात मागणी आहे. यातून चांगले उत्पन्नही घेता येऊ शकते.चंदन लागवड कशी करावी? लागवडीची पूर्वतयारी, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन व चांगल्या चंदन वाढीसाठी घ्यावयाची काळजी यासंबंधी कार्यशाळेत माहिती दिली जाणार आहे. शेतीत व निवासी जागेत पूर्वतयारी करणाऱ्या सहभागी शेतकरी व पर्यावरणप्रेमींना चंदनाची रोपेही दिली आहेत. घागरे हे १९८५पासून चंदन शेती या विषयात कार्यरत आहेत. ४ लाख रोपांच्या नर्सरीपासून त्यांनी चंदन शेतीला सुरुवात केली होती. कालांतराने बंगलोर येथील चंदन संशोधन संस्थेत जाऊन शास्त्रोक्त अभ्यास करुन चंदनतज्ज्ञ अशी ओळख निर्माण केली. पर्यावरणासाठी स्वत:ला वाहून घेतलेल्या घागरे यांच्या कामाला सन्मान म्हणून सोलापूर विद्यापीठाने त्यांना सिनेट सदस्यत्व बहाल केले आहे. कोकणातील पर्यावरणप्रेमींना चंदन लागवडीसाठी प्रवृत्त करण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. मर्यादित प्रवेश असलेल्या या कार्यशाळेस उपस्थित राहू इच्छिणाऱ्यांनी श्री परशुराम सानिध्य निसर्ग पर्यटन केंद्र, पेढे परशुराम येथे संपर्क साधावा, असे आवाहन निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळ महाराष्ट्राचे राज्य उपाध्यक्ष विलास महाडिक व राज्य संघटक धीरज वाटेकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)चांगले अर्थार्जन : प्रतिकिलो ४ हजार दरचंदनाला बाजारात चांगली मागणी असून, चंदनाच्या शेतीतून चांगले अर्थार्जन मिळू शकते. चंदनाचा भाव प्रतिकिलो ४ हजार ते ४ हजार ५०० इतका आहे. तसेच २० वर्षे वाढलेल्या चंदनापासून २८ किलो लाकूड मिळते. या वृक्षाची रत्नागिरी जिल्ह्यात लागवड होण्यासाठी निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांना याकडे वळविण्यात येणार आहे.चंदनतज्ज्ञ उपस्थितचिपळूण येथे होणाऱ्या या कार्यशाळेला चंदनतज्ज्ञ घागरे मार्गदर्शन करणार आहेत. १९८५ पासून ते चंदन शेती विषयात कार्यरत असून, त्यांनी ४ लाख रोपांच्या नर्सरीपासून चंदन शेतीला सुरूवात केली आहे. चंदनाची लागवड कशी करावी, याबरोबरच त्याच्या वाढीची माहिती ते देणार आहेत.