शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

दत्ता सामंत यांच्या वर्णीची शक्यता

By admin | Updated: July 8, 2014 00:42 IST

काँग्रेस जिल्हाध्यक्षपद : फेरबदलाचे संकेत

महेश सरनाईक ल्ल कणकवलीलोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पक्षाला उभारी देवून पुन्हा विधानसभा निवडणुकीत यश मिळविण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांची आगामी राजकीय रणनिती लक्षवेधी ठरणार आहे. जिल्ह्यातील काँग्रेस अंतर्गत काही फेरबदल होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली असून यामध्ये नारायण राणे यांचे विश्वासू आणि कट्टर समर्थक दत्ता सामंत यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक गावागावात काँग्रेसची मजबूत पकड आहे. गेल्या २५ वर्षात नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांची फळीच तयार केली आहे. असे असताना लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातून ६५ हजारांचे मताधिक्य शिवसेना उमेदवाराला मिळाले. त्यामुळे नारायण राणे यांच्याबरोबरच त्यांचे सुपूत्र काँग्रेसचे प्रांतिक सदस्य नीतेश राणे नाराज आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे विश्लेषण करताना नीतेश राणे यांनी खासदार नीलेश राणे यांचा पराभव पक्षात वाढलेली ठेकेदारी आणि आप्तस्वकियांमुळेच झाल्याचे कणकवलीत पत्रकार परिषद घेवून जाहीर केले होते. पुढील काळात जर जिल्हावासीयांना पडते, कुडाळकर, सावंत, तेली ही नावे आमदार म्हणून हवी असतील तर त्यांनी तसे जाहीर करावे आपण त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम करण्यास तयार असल्याचे खोचक विधान केले होते. त्यानंतर राजन तेली, संजय पडते आणि काका कुडाळकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून या टीकेला उत्तरदेखील दिले. नीतेश राणे यांच्या भूमिकेचे काँग्रेसमधील एका गटाने कणकवली आणि कुडाळमध्ये फटाके वाजवून स्वागतदेखील केले होते. नीतेश राणेंच्या विधानानंतर जिल्ह्यात काँग्रेसअंतर्गत धुसफूसत असलेल्या ज्वालाग्नीचा जणू स्फोटच झाला होता. मागील आठवड्यात घडलेल्या या सर्व घटनानंतर नारायण राणे रविवारपासून जिल्ह्यात दाखल झाले आहेत. रविवार आणि सोमवार हे दिवस ते कणकवलीत वास्तव्यास आहेत. तर मंगळवारी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठकदेखील होणार आहे. या बैठकीत राणे कोणती भूमिका मांडतात. या विषयावर कशाप्रकारे भाष्य करतात. याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.दरम्यान, सोमवारी काका कुडाळकर, राजन तेली, संजय पडते यांनी नारायण राणे यांच्या निवासस्थानी हजेरी लावली होती. परंतु यावेळी कोणती चर्चा झाली याबाबतची माहिती समजू शकली नाही.