शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
3
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
4
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
5
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
6
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
7
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
8
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
9
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
10
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
11
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
13
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
14
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
15
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
16
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
17
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
18
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
19
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
20
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले

सावंतवाडीच्या नव्या ठाणेदारांना अवैध धंदे रोखण्याचे आव्हान

By अनंत खं.जाधव | Updated: September 2, 2022 21:57 IST

सावंतवाडी पोलीस निरीक्षक पदावरून सुनिल धनावडे यांची बदली झाल्यानंतर सावंतवाडी पोलीस निरीक्षक पदाची खुर्ची संगीत खुर्ची बनल्याचे दिसत आहे.

सावंतवाडी : सावंतवाडी पोलीस ठाण्याला अवघ्या एका वर्षातच नवीन प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्याकडे प्रभार देण्यात आला असून आता त्याच्या पुढे शहरांसह तालुक्यातील अवैध धंदे रोखण्या बरोबरच पोलीस कर्मचाऱ्यांत समन्वय राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे. मात्र ते यात कितपत यशस्वी होतात हे बघणे सध्यातरी औत्सुक्याचे ठरणार असले तरी सावंतवाडी पोलीस निरिक्षकांची खुर्ची संगीत खुर्ची बनू नये अशीच अपेक्षा सर्वजणच व्यक्त करत आहेत.

सावंतवाडी पोलीस निरीक्षक पदावरून सुनिल धनावडे यांची बदली झाल्यानंतर सावंतवाडी पोलीस निरीक्षक पदाची खुर्ची संगीत खुर्ची बनल्याचे दिसत आहे. याचे कारण म्हणजे मागील  तीन वर्षात या ना त्या कारणाने सावंतवाडीत पाच ते सहा प्रभारी अधिकारी येऊन गेलेत त्यात अधिकचा कालावधी मिळाला तो निवृत्त पोलीस निरीक्षक शशीकांत खोत यांच्यासह सध्या वाहतूक शाखेत बदली करण्यात आलेले शंकर कोरे यांना मात्र या दोघांच्या कालावधीत पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे,सचिन हुंदळेकर तसेच एस. चिंदरकर,राजेंद्र हुलावले आदिनी ही काहि दिवसांसाठी सावंतवाडी पोलीस निरीक्षकांच्या खुर्चीचा ताबा घेतला होता. पण गेल्या वर्षभरात पोलीस निरीक्षक म्हणून शंकर कोरे हे येथील पोलीस ठाण्यात कार्यरत होते.मात्र त्याच्या सह  अगोदर  असलेल्या खोत यांच्या कार्यकाळात मोठ्याप्रमाणात अवैध धंद्याचा सुळसुळाट झाल्याचे दिसून आले.स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडून सावंतवाडीत जुगार अड्ड्यावर धाडी टाकल्या खऱ्या मात्र यात सावंतवाडी पोलीस अधारतच राहिले  असल्याचे दिसून आले.तर सावंतवाडी पोलीसांकडून दोन वेळा जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यात आली  मात्र ही कारवाई चांगलीच चर्चेत राहिली होती.

जुगार अड्ड्या प्रमाणेच  अवैध दारू वाहतूक ही मोठ्याप्रमाणात सुरूच आहे. पण सावंतवाडी शहरात नाक्या-नाक्यावर अवैध दारूची होणारी विक्री तसेच काहि गावात राजरोस पणे सुरू असलेली दारू वाहतूक रोखणे हे नव्या पोलीस निरीक्षका पुढचे आवाहन असणार आहे. कारण मागील दोन वर्षांत अवैध धंद्याना मोकळा हात दिल्याने अनेक लहान लहान युवक थेट अवैध धंद्यात येऊ लागलेत.तसेच काहि नाक्यावर तर अवैध धंद्येवाईकाचा अड्डा च झाला होता.याअवैध धंदेवाईकापुढे पोलिसाची खाकी ही कमी पडू लागली आहे कि काय असेच वातावरण शहरात पसरू लागल्याचे दिसून येत आहे.

ड्रग्ज गांजा यांचाही वापरही वाढू लागल्याने नवीन पिढीला यातून बाहेर काढण्याचे आवाहन ही पोलीसा समोर आहे.अवैध धंदेवाईकाचे छुपे अड्डेही पोलीसांना शोधून काढावे लागणार असून हे सर्व करत असताना नव्या पोलीस निरीक्षकांना कर्मचाऱ्यांना ही विश्वासात घ्यावे लागणार आहे तसेच  त्याच्यात पुन्हा एकदा विश्वास निर्माण करावा लागणार आहे. त्यामुळे आता नवीन पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे कशा प्रकारे सावंतवाडीला पुढे घेऊन जात असतना अवैध धंद्याचा बिमोड कसा करणार हे बघावे लागणार आहे.

टॅग्स :SawantwadiसावंतवाडीPoliceपोलिस