शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
6
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
7
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
8
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
9
आयोग नव्हे, मतदारच राजा !
10
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
11
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
12
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
13
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
14
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
15
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
16
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
17
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
18
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
19
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
20
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!

चाकरमानी निघाले परतीच्या प्रवासाला! कणकवलीत एसटी, रेल्वे गाड्यांना गर्दी

By सुधीर राणे | Updated: September 6, 2022 17:36 IST

चाकरमान्यांनी केलेल्या गर्दीमुळे बसस्थानक व रेल्वे स्टेशनचा परिसर गजबजून गेला होता.

कणकवली : गणेशोत्सवासाठीसिंधुदुर्गात आलेले चाकरमानी आता मोठ्या संख्येने परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. मुंबईला जाण्यासाठी चाकरमान्यांनी कणकवली बसस्थानक व रेल्वे स्टेशनवर मंगळवारी मोठी गर्दी केली होती. चाकरमान्यांनी केलेल्या गर्दीमुळे बऱ्याच कालावधीनंतर बसस्थानक व रेल्वे स्टेशनचा परिसर गजबजून गेला होता.गौरी - गणपतीचे विसर्जन केल्यानंतर चाकरमानी मुंबईकडे निघाले आहेत. कोरोनाच्या महामारी नंतर निर्बन्ध शिथिल झाल्यानंतर मुंबईतून हजारोच्या संख्येने चाकरमानी सिंधुदुर्गातगणेशोत्सवासाठी दाखल झाले होते. खासगी गाड्या, एसटी व त्यानंतर रेल्वे गाड्यांमधून गणेशोत्सवापूर्वी हे चाकरमानी सिंधुदुर्गातील आपल्या गावी पोहोचले होते.        दरवर्षीप्रमाणेच आरती, भजने गणरायासमोर करण्यात आली. विविध पारंपरिक कार्यक्रमांमध्ये हे चाकरमानी भक्तिभावाने सहभागी झाले होते. चाकरमान्यांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावी आल्यावर एकप्रकारे मोकळा श्वास घेता आला होता. गणेशोत्सवात दीड, पाच  तसेच सहाव्या दिवशी गौरी - गणपती व पुन्हा सातव्या दिवशी गणरायांना निरोप दिल्यानंतर चाकरमानी पुन्हा एकदा आपल्या नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईला परतू लागले आहेत.  गणरायाच्या चरणी सर्व संकटे लवकर टळू दे, असे साकडे घालतानाच 'पुढच्या वर्षी लवकर या' असे म्हणत हे चाकरमानी मुंबईला निघाले आहेत. बसस्थानक व रेल्वे स्टेशन परिसरात मंगळवारी दुपारनंतर चाकरमान्यांची मोठी गर्दी झाली होती. एसटी अथवा रेल्वे गाडी मुंबईच्या दिशेने रवाना होत असतानाच 'गणपती बाप्पा मोरया' असा जयघोष चाकरमानी करताना दिसत होते.   

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गGanesh Mahotsavगणेशोत्सव