शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

चिपळूणमध्ये पावणेनऊ कोटींचे केटामाईन जप्त

By admin | Updated: June 15, 2017 23:05 IST

चिपळूणमध्ये पावणेनऊ कोटींचे केटामाईन जप्त

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी/चिपळूण : चिपळूण शहरात केटामाईन या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती अधिकच असल्याचे पुढे आले आहे. अटक करण्यात आलेल्या मंगेश दीपक कदम (रा. मोरवंड पिंपळवाडी, ता. खेड) याच्या घरातून पुन्हा ५ किलो ८८० ग्रॅम केटामाईन जप्त केले आहे. त्यामुळे जप्त केलेल्या एकूण केटामाईनची किंमत ८ कोटी ७७ लाख २० हजार रुपयांपर्यंत गेली आहे.याप्रकरणात अजूनही काहीजणांचा समावेश असण्याची शक्यता असून, त्याचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांनी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले की, चिपळूण एसटी स्टँडच्या मागे एक व्यक्ती केटामाईन हा अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस कॉन्स्टेबल वाय. पी. नार्वेकर यांना मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने सापळा रचला. दुपारच्या वेळेत संतोष हरी कदम केटामाईन घेऊन आला. त्याच्याकडून सुमारे ४ कोटी रुपयांचे ५ किलो ८५ ग्रॅम केटामाईन जप्त केले.संतोष कदम याला ताब्यात घेतल्यानंतर या गुन्ह्यात स्वप्निल वासुदेव खोचरे (वय २७, रा. पेठमाप चिपळूण) व मंगेश दीपक कदम (२० रा. खेड) या दोघांचा सहभाग असल्याचे समोर आले. त्यामुळे त्या दोघांनाही पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. बुधवारी पोलिसांनी मंगेश कदमच्या घराची झडती घेतली. त्याच्या घरात पोलिसांनी तब्बल ५ किलो ८८० ग्रॅम केटामाईन जप्त केले. गेल्या तीन दिवसांत पोलिसांनी १० किलो ९६५ ग्रॅम इतके म्हणजेच सुमारे ८ कोटी ७७ लाख रुपयांचे केटामाईन जप्त केले असल्याची माहिती प्रणय अशोक यांनी दिली.मटका रडारवरअमली पदार्थसोबत जिल्ह्यात राजरोसपणे सुरू असलेल्या मटका धंद्यावर कारवाईचा बडगा उभारण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात चालणाऱ्या बेकायदेशीर धंद्यावर चाप बसविणार असल्याची माहिती प्रणय अशोक यांनी दिली.जेवणाच्या डब्यातून केटामाईनकेटामाईन प्रकरणात अटक झालेला मंगेश कदम हा सुप्रिया लाईफ सायन्स लि. कंपनी लोटे याठिकाणी सप्टेंबर २०१६ ते डिसेंबर २०१६ या दरम्यान कामाला होता. त्यावेळी जेवणाच्या डब्यातून त्याने चार वेळा आणि सॅकमधून तीनवेळा असा मिळून १० किलो ९६५ ग्रॅमचा केटामाईन हा अमली पदार्थ आणल्याचे तपासात पुढे आले आहे.