शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

महत्त्वाच्या परीक्षांचे केंद्र सिंधुदुर्गात व्हावे : वैभव नाईक यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 19:39 IST

कुडाळ : सध्याच्या शिक्षण प्रणालीनुसार बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळविण्यासाठी  विद्यार्थ्यांना नीट, जेईई आदी परीक्षा देणे आवश्यक आहे. मात्र, ...

ठळक मुद्दे उदय सामंत यांना निवेदन सादर

कुडाळ : सध्याच्या शिक्षण प्रणालीनुसार बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळविण्यासाठी  विद्यार्थ्यांना नीट, जेईई आदी परीक्षा देणे आवश्यक आहे. मात्र, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांची परीक्षा केंद्रे सिंधुदुर्ग जिल्ह्यात नसल्याने विद्यार्थी मागे पडत आहेत.

अशा महत्त्वाच्या परीक्षांचे केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात होण्यासाठी  महाराष्ट्र शासनाने शिफारशीसह केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी कुडाळ-मालवण  मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

याबाबत  उदय सामंत यांनी सकारात्मक चर्चा करीत या परीक्षा केंद्रांबाबत केंद्रशासनाला शिफारस करण्याचे आदेश प्रधान सचिवांना दिले आहेत. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या परीक्षा देण्यासाठी कोल्हापूर अथवा गोवा येथे जावे लागते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे हे परीक्षा  केंद्र मिळाल्यास जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नीट, जेईई परीक्षा देणे सोयीचे होईल. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने शिफारशीसह केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, जेणेकरून केंद्र शासनाकडे  पाठपुरावा करणे सोयीचे होईल, अशी मागणी आमदार नाईक यांनी केली.त्याबाबत प्रधान सचिवांना या परीक्षा केंद्राबाबत केंद्रशासनाला शिफारस करण्याचे आदेश  उदय सामंत यांनी दिले असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.अभ्यासकेंद्रे नसल्याने विद्यार्थी मागेसिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील शंभर टक्के साक्षर जिल्हा व पहिला पर्यटन जिल्हा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इयत्ता दहावी-बारावीमधील विद्यार्थी कोकण बोर्डात नेहमी अव्वल असतात. मात्र, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांची परीक्षा केंद्रे सिंधुदुर्ग जिल्ह्यात नसल्याने व्यावसायिक अभ्यासक्रमात विद्यार्थी मागे पडतात. पुढील काळात शैक्षणिक विकास होण्यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमास विद्यार्थी जाणे गरजेचे आहे. त्यासाठी अशा महत्त्वाच्या परीक्षांचे केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणे आवश्यक आहे. याकडे आमदार वैभव नाईक यांनी  उदय सामंत यांचे लक्ष वेधले.

टॅग्स :konkanकोकणsindhudurgसिंधुदुर्ग