शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भुयारी रेल्वे मार्गाच्या भूसंपादनास केंद्राची मंजुरी, अध्यादेश जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 18:51 IST

कोकिसरेतील रेल्वे फाटकाला पर्यायी भुयारी मार्गासाठी २.२ किलोमीटर जमीन संपादित करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे २२ वर्षांपासून वाहन चालकांची डोकेदुखी ठरलेल्या रेल्वे फाटकाच्या अडथळ्यातून नजीकच्या काळात सुटका होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

ठळक मुद्देभुयारी रेल्वे मार्गाच्या भूसंपादनास केंद्राची मंजुरी, अध्यादेश जारी कोकिसरेतील रेल्वे फाटकाच्या अडथळ्यातून वाहन चालक, प्रवाशांची होणार सुटका

वैभववाडी : कोकिसरेतील रेल्वे फाटकाला पर्यायी भुयारी मार्गासाठी २.२ किलोमीटर जमीन संपादित करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे २२ वर्षांपासून वाहन चालकांची डोकेदुखी ठरलेल्या रेल्वे फाटकाच्या अडथळ्यातून नजीकच्या काळात सुटका होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.तळेरे-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावर कोकिसरे रेल्वेफाटक आहे. कोकण रेल्वे मार्गावर दरदिवशी रेल्वे गाड्यांच्या सुमारे ४४ ते ५० फेऱ्या होतात. त्यामुळे हा मार्ग दिवसभरात सुमारे चौदा ते सोळा तास बंद राहतो. याशिवाय उन्हाळी सुटी तसेच गणेशोत्सव, दिवाळी, नाताळच्या जादा गाड्यांमुळे त्याहून अधिक काळ फाटकामुळे हा मार्ग बंद राहतो. त्यामुळे कोकिसरेतील रेल्वेफाटक वाहनचालकांना नकोसे झाले आहे.त्या अनुषंगाने २००८ पासून कोकिसरे रेल्वेफाटकाला पर्यायी मार्ग व्हावा, अशी मागणी जोर धरू लागली. त्यामुळे माजी आमदार प्रमोद जठार यांनी पक्षाच्या माध्यमातून जनआंदोलन छेडून रेल्वेफाटकाचा मुद्दा उचलून धरला. कालांतराने रेल्वे फाटकालगत उड्डाण पुलाचा पर्याय पुढे आला. परंतु उड्डाणपुलाचा पर्याय भौगोलिकदृष्ट्या अवघड असल्याचे अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर स्पष्ट झाले.त्यानंतर रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्या संयुक्त पाहणीअंती जठार यांनी भुयारी मार्गाचा पर्याय दिला. त्यावर दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांचे एकमत झाले. या भुयारी मार्गाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे गेल्यानंतर शासनाने या भुयारी मार्गाचे बांधकाम व जोडरस्त्यांसाठी ६४ कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे. या भुयारी मार्गासाठी तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गालगत २.२ किलोमीटर जमिनीचे संपादन करणे आवश्यक आहे. यासंबंधी प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला होता.या प्रस्तावाला आता केंद्रशासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६(जी) या महामार्गावर १०.८ किलोमीटर ते १३ किलोमीटर या अंतरातील जमीन संपादित करण्याचे आदेश कणकवली उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे बहुप्रतीक्षित कोकिसरे भुयारी मागार्चा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.दोन महिन्यांत भूसंपादन

यामध्ये भूसंपादन प्रक्रियेचे दोन टप्पे असतात, ते पुढील दोन महिन्यांत पूर्ण केले जातील. तसेच भुयारी मार्गाच्या कामाची निविदाही काढण्यात येईल, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कोल्हापूर विभागाच्या उपअभियंता पूजा बारटक्के यांनी सांगितले.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेsindhudurgसिंधुदुर्ग