शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

शिमगोत्सवाची परंपरागत पध्दतीने सांगता; कणकवलीत सप्त रंगांची उधळण

By सुधीर राणे | Updated: April 8, 2024 17:37 IST

कणकवली : ' रंगात रंगू या सारे' असे म्हणत कणकवली शहरात सप्तरंगांची उधळण करीत मोठ्या उत्साहात सोमवारी रंगपंचमी साजरी ...

कणकवली : ' रंगात रंगू या सारे' असे म्हणत कणकवली शहरात सप्तरंगांची उधळण करीत मोठ्या उत्साहात सोमवारी रंगपंचमी साजरी करण्यात आली. या रंगपंचमीने येथील शिमगोत्सवाची परंपरागत पध्दतीने सांगता झाली. रंगपंचमी खेळताना बच्चे कंपनीबरोबरच तरुणाईचाही उत्साह दांडगा होता.शिमगोत्सवात रंगपंचमीला खूप महत्व असते. या रंगपंचमीला धुळवड किंवा धूलिवंदन असेही म्हटले जाते. प्रत्येक गावात तेथील परंपरेनुसार विविध दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. काही ठिकाणी होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी तर काही ठिकाणी पाचव्या दिवशी रंगपंचमी खेळली जाते. कणकवलीत गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. याठिकाणी पंधरा दिवसांचा शिमगोत्सव असतो. काही घरांच्या ठिकाणीही होळीचे मांड असतात. या ठिकाणिहि परंपरागत पध्दतीने सांस्कृतिक कार्यक्रम होतात. राधा, कृष्ण, गोप यांच्या जोडीने अनेक सोंगे आणली जातात.शहरातील काही ठिकाणी बच्चे कंपनी सोमवारी सकाळपासूनच रंगपंचमीचा आनंद लूटत असले तरी दुपारी १.३० वाजल्यानंतर साधारणतः रंगपंचमी साजरी करण्यास सुरुवात झाली. रंगपंचमीची जय्यत तयारी शहरातील तरुणाईने केली होती.रंग बनविण्याबरोबरच अनेक 'प्लॅन' मनोमन रचले होते. त्यांना मूर्त स्वरूप देण्यात आले. रंग पंचमीच्या पार्श्वभूमिवर विविध प्रकारचे रंग, पिचकाऱ्या बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झाले होते. बच्चे कंपनीची रंग तसेच इतर साहित्य खरेदीसाठी सकाळी बाजारपेठेत लगबग दिसून येत  होती.शहरात  दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास रंगपंचमीला सुरुवात झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास प्रथेप्रमाणे ढोल वाजल्यावर ही रंगपंचमी थांबविण्यात आली. त्यानंतर श्री रवळनाथ मंदिराजवळील गाव होळी जवळ परंपरागत पध्दतीने काही धार्मिक विधी पार पड़ल्यानंतर शिमगोत्सवाची सांगता करण्यात आली. सोमवारी शहरातील तेलीआळी, टेंबवाड़ी, बाजारपेठेसह विविध भागात रंगपंचमी साजरी करण्यात आली. या रंगपंचमीच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. तरुणाईने रंगोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला. यात युवतीही सहभागी झाल्या होत्या. चेहरे रंगवून काही तरुण शहरातून दुचाकीवरुन फेरफटका मारताना दिसत होते. रंगपंचमीच्या निमित्ताने लहान थोर सर्वानीच आनंद लुटला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग