शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

³सतरा वर्षांनी स्नेहबंधाच्या आठवणींना उजाळा

By admin | Updated: November 12, 2014 22:50 IST

विद्यार्थी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने एकत्र : सावंतवाडीत १९९७ च्या बीएस्सी बॅचचा मेळावा

सावंतवाडी : शाळा, कॉलजचे दिवस संपले की प्रत्येकजण आपआपल्या करिअरसाठी वेगवेगळ््या क्षेत्राकडे धाव घेतो. मात्र, ज्या शाळेमध्ये, ज्या कॉलेजमध्ये आपण शिकलो, लहानाचे मोठे झालो, वेगवेगळ््या भागातील विद्यार्थ्यांबरोबर आपण मैत्रीचे नाते जोडले, ती नाळ मात्र तशीच असते. सर्वांना एकदा भेटावे, एकमेकांशी हितगुज करावे, असे सर्वांना वाटते. मात्र, प्रत्येकजण आपआपल्या नोकरीधंद्यात व्यस्त असल्याने ते सहजासहजी शक्य होत नाही. मात्र, ते अशक्यही नाही.श्री पंचम खेमराज महाविद्यालयात १९९७ साली बीएस्सीची पदवी घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी स्रेहसंमेलनाच्या निमित्ताने एकत्र आले आणि १७ वर्षांनी कॉलेज जीवनातील स्रेहबंधाच्या आठवणींना उजाळा मिळाला. या आगळ््यावेगळ््या कार्यक्रमाने सारेच भारावून गेले आणि पूर्वीच्या आठवणी, नोकरी-धंदा करताना आलेले बरे-वाईट अनुभव अशा अनेक गोष्टी एकमेकांशी शेअर केल्या.येथील पंचम खेमराज महाविद्यालयात १९९७ साली रसायन शास्त्र, प्राणी शास्त्र, वनस्पती शास्त्र अशा वेगवेगळ््या विषयात बीएस्सी पदवी घेऊन बाहेर पडलेल्या आणि आज वेगवेगळ््या क्षेत्रात करिअर करणाऱ्या १९९७ सालच्या बीएस्सी बॅचच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ज्यांच्याकडे एकमेकांचे पत्ते किंवा फोन नंबर होते त्यांनी ही कल्पना एकमेकांना सांगितली आणि साऱ्यांनीच ती उचलून धरली. एक महिना अगोदर याबाबतची तयारी सुरू झाली. त्यानुसार ९ नोव्हेंबर रोजी हे सर्व माजी विद्यार्थी सावंतवाडीतील हॉटेल मँगोच्या सभागृहात एकत्र आले.केवळ एकत्रच आले नाही तर त्यांनी त्यावेळचे प्राणीशास्त्राचे प्राध्यापक आणि आताचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप भारमल यांनाही या आगळ््यावेगळ््या कार्यक्रमासाठी निमंत्रिक केले. डॉ. भारमलदेखील याच आपुलकीने या छोटेखानी समारंभात सहभागी झाले. सुरूवातीला या कार्यक्रमासाठी पुढाकार घेणारे माजी विद्यार्थी दत्तप्रसाद ठाकूर यांनी या कार्यक्रमाची संकल्पना स्पष्ट केली आणि नंतर प्रत्येकाने आपापली पुन्हा एकदा ओळख करून देत आपण कोणत्या क्षेत्रात काम करीत आहोत, याबाबतची माहिती दिली. प्राचार्य डॉ. दिलीप भारमल यांनीही आपल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना महाविद्यालयाचे वेगवेगळे उपक्रम आणि प्रगतीबाबत माहिती दिली. कॉलेजमधून पदवी घेऊन बाहेर पडून अनेक वर्षे झाली. प्रत्येकजण वेगवेगळ््या क्षेत्रात करिअर करीत आहे. तरीही एकमेकांबद्दलचा स्रेहभाव कमी झालेला नाही. गुरूजनांबद्दलचा जपलेला आदरभाव पाहून प्राचार्य डॉ. भारमल यांनीही या सर्व माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. आपल्या कॉलेजचे विद्यार्थी वेगवेगळ््या क्षेत्रात काम करीत असून त्यांनी कॉलेजचे नाव उज्ज्वल केले आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या.यावेळी माजी विद्यार्थ्यांच्यावतीने प्राचार्य डॉ. दिलीप भारमल यांचा खास सत्कारही करण्यात आला. दुपारच्या सत्रात स्रेहभोजनानंतर माजी विद्यार्थ्यांनी कॉलेज सोडल्यानंतर पुढील शिक्षणासाठी जाताना किंवा करिअरच्या वाटा धुंडाळताना आलेले अनुभव एकमेकांना शेअर केले. तसेच आपले कलागुणही सादर केले. हे करीत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांच्या डोळ््यात एकमेकांबद्दलचा स्रेहभाव दृढ झालेला पहायला मिळाला. आपण वेगवेगळ््या क्षेत्रात असलो तरी एकमेकांच्या नेहमीच संपर्कात राहूया, एकमेकांसाठी नेहमीच मदतीचा हात पुढे करूया, असा निर्धार या विद्यार्थ्यांनी केला. तसेच यापुढे दरवर्षी या स्रेहसंमेलनाच्यानिमित्ताने एकत्र येण्याचा निर्णयही घेण्यात आला.पंचम खेमराजचे प्राध्यापक डॉ. मर्गज तसेच माजी विद्यार्थी दत्तप्रसाद ठाकूर, मनोहर गोवेकर, अजित सावंत, प्रसाद वालावलकर, मुस्तफा काझी, संजय गवस, अमोल राणे, गोविंद धुरी, नीलेश तेरसे, फिरोज शेख, अमित काणेकर, शैलेश शिरोडकर, परशुराम नाटेकर, वासुदेव नार्वेकर, विनायक कविटकर, उन्नती उकडीवे, नूतन कर्पे, प्रज्ञा परब, मिलन दळवी, किरण धुरी, सोनी पोकळे, स्मिता देऊलकर, सोनाली तिरोडकर, विद्या सावळ, सफुरा बेग, नजत राजगुरू, व्हलेंटीना फर्नांडीस, स्मिता ठाकूर, प्रज्ञा वालावलकर, योगिता कोरगावकर आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)