शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

काजू खरेदी दरात घट, शेतकरी आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 11:23 IST

दोडामार्ग आठवडा बाजारात काजू खरेदी करण्यासाठी तालुक्यातील तसेच तालुक्याबाहेरील व्यापारी हजेरी लावतात. मागील आठवड्यात रविवारी काजू खरेदी दर प्रति किलो १४० रुपये होता. मात्र, या रविवारी दरात घट होऊन प्रति किलो १३० रुपयेप्रमाणे काजू खरेदी केली जात होती. आठ दिवसांत प्रति किलोमागे दहा रुपयांची तफावत झाल्याने काजू बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे. अशाप्रकारे घट झाल्यास यावर्षी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

ठळक मुद्देकाजू खरेदी दरात घट, शेतकरी आर्थिक संकटात आठ दिवसांत दहा रुपयांची तफावत

दोडामार्ग : दोडामार्ग आठवडा बाजारात काजू खरेदी करण्यासाठी तालुक्यातील तसेच तालुक्याबाहेरील व्यापारी हजेरी लावतात. मागील आठवड्यात रविवारी काजू खरेदी दर प्रति किलो १४० रुपये होता. मात्र, या रविवारी दरात घट होऊन प्रति किलो १३० रुपयेप्रमाणे काजू खरेदी केली जात होती. आठ दिवसांत प्रति किलोमागे दहा रुपयांची तफावत झाल्याने काजू बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे. अशाप्रकारे घट झाल्यास यावर्षी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.गतवर्षी झालेल्या दुष्काळी पावसामुळे व वातावरणातील बदलांमुळे काजू पिकावर मोठा परिणाम झाला आहे. डिसेंबर महिन्यात काजूच्या झाडांना पालवी फुटण्याच्या काळात पावसाने जोर धरल्याने पालवी फुटण्यास विलंब झाला. त्यात वातावरणात होणाऱ्या बदलामुळे काजूच्या झाडावर रोगराई पसरल्यामुळे किरकोळ आलेला मोहोरही गळून गेला.

शेतकऱ्याला काजू बागेतून वर्षाकाठी मिळणाऱ्या उत्पादनाच्या २० टक्के उत्पादन यावर्षी मिळणे कठीण झाले आहे. उत्पादन कमी झाले तर दर उंचावतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, परिस्थिती उलट असून, गतवर्षीच्या दरापेक्षा यंदाच्या दरात घट होत असल्याची चिन्हे दिसत आहेत.दोडामार्गच्या रविवार आठवडा बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून मागील आठवड्यात प्रति किलो १४० रुपये दराने काजू खरेदी केला जात होता. मात्र, या रविवारी प्रति किलो १३० रुपयांनी काजू खरेदी करण्यात आला. आठ दिवसात प्रति किलोमागे दरात १० रुपयाने घट झाल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे.शासनाने दर निश्चित करणे गरजेचेजिल्ह्यातील तसेच तालुक्यातील बहुतांशी लोक काजू पिकावर अवलंबून आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांच्या चरितार्थ काजू पिकावर चालतो. मात्र, यावर्षी काजू पीक कमी प्रमाणात आहे. उत्पादन कमी झाले असून व्यापाऱ्यांनी काजू खरेदी दरही ताणून धरला आहे.

दिवसेंदिवस दरात घट होताना दिसत आहे. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त आहे. शासनाने काजू दर निश्चित करून शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे. 

टॅग्स :Marketबाजारsindhudurgसिंधुदुर्ग