शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी एकजण ताब्यात-पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 11:40 IST

कणकवली तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयीत आरोपी सचिन उर्फ पपल्या महादेव चाळके (३६, बेळणेखुर्द, वरचीवाडी) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा २६ जानेवारी ते ४ एप्रिल २०१९ या कालावधीत

कणकवली : कणकवली तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयीत आरोपी सचिन उर्फ पपल्या महादेव चाळके (३६, बेळणेखुर्द, वरचीवाडी) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा २६ जानेवारी ते ४ एप्रिल २०१९ या कालावधीत घडला असुन संशयिताविरोधात विनयभंग केल्याप्रकरणी विविध कलमांबरोबरच  बालकाचे लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा २०१२ (८)(१२) (पॉस्को)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        दरम्यान,  कणकवली पोलीसांनी संशयित आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.        याबाबत  अधिक माहिती अशी की,  पिडीत मुलगी ही  सातवीत शिकत असुन संशयीत आरोपी सचिन चाळके हा गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत तीचा चोरुन पाठलाग करत होता. एकदा वाटेत अडवुन तुझ्या पप्पांना व भावाला ठार मारुन टाकेन, अशी धमकीही  पिडीत मुलीला त्याने दिली होती. मोबाईलवर अश्लिल मेसेज करत संशयीत आरोपीने पिडित मुलीला एकांतात गाठुन अश्लिल संभाषण करत तिचा विनयभंगही  केला होता.

      त्यामुळे घडलेला प्रकार त्या घाबरलेल्या मुलीने नातेवाईकांच्या कानावर घातला. त्यानुसार कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सचिन चाळके याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.  याप्रकरणाचा अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गsexual harassmentलैंगिक छळ